Mizoram CM : मंत्री कोण, हे ठरवण्याचा अधिकार मला नाही! शपथ घेण्याआधी भावी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य चर्चेत

Lalduhoma : लालदूहोमा यांच्या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत ४० पैकी २७ जागांवर विजय मिळाला आहे.
Lalduhoma
LalduhomaSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2023 : मिझोरममध्ये झोरम पीपल्स मुव्हमेंटने सत्ता मिळवत चमत्कार केला आहे. या पक्षाचे राज्यात पहिल्यांदाच सरकार बनणार असून लालदूहोमा हे शुक्रवारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण त्याआधीच त्यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. ‘आपल्या मंत्रिमंडळात मंत्री कोण असावेत, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही,’ असे ते म्हणाले आहेत.

लालदूहोमा यांच्या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत ४० पैकी २७ जागांवर विजय मिळाला आहे. लालदूहोमा यांनी शपथविधीचा दिवस ठरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळात (Cabinet Minister) महिलांचा समावेश करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, हे अद्याप ठरलेले नाही. झेडपीएम ची यंत्रणा वेगळी आहे. आमच्या पक्षाची स्वत:ची राज्यघटना असून त्यानुसार माझ्याकडे मंत्री नियुक्त करण्याची जबाबदारी किंवा अधिकार नाही. (Mizoram News)

Lalduhoma
Arvind Kejriwal : भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून अन् केजरीवालांनी काँग्रेस सरकारचीही लावली चौकशी

मंत्र्यांची निवड संयुक्तपणे पक्षातील ज्येष्ठांचे मंडळ करेल. त्याबाबतची बैठक आज रात्री होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असेही लालदूहोमा यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच राज्याच्या विकासाचा शंभर दिवसांचा प्लॅन जाहीर करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शपथविधी झाल्यानंतर लेगच पत्रकार परिषद घेऊन प्लॅन जाहीर केला जाईल. त्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी मिझोरामच्या राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानुसार आठ तारखेला शपथविधी होणार आहे.

(Edited By - Rajanand More)

Lalduhoma
BJP News : सत्ता मिळताच माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप; सरकारी अधिकाऱ्यांना दिली तंबी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com