Buldhana News : तीन राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाल्यानंतर सर्वत्र भाजपकडून जल्लोष सुरू असताना बुलडाण्याच्या मेहकर मध्ये मात्र भाजप मधील अंतर्गत वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांची डोकी फोडेपर्यंत राडा झाला. आता या प्रकरणी भाजपाच्या ६ पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी तडकाफडकी ही कारवाई केली आहे.
भाजपसाठी(BJP) आजचा दिवस जल्लोषाचा असतांना मेहकरात मात्र याउलट घडलं. अंतर्गत वाद विकोपाला जाऊन दोन गट एकमेकांवर भिडले. आणि यामध्ये काहीजण जखमी ही झाले. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई यांच्या कार्यालयात आज पत्रकार परिषद होणार होती. त्यापूर्वी प्रल्हाद अन्ना लष्कर आणि शिव ठाकरे यांच्यासह 20 ते 25 लोकांनी प्रकाश गवई आणि अर्जुन वानखेडे, सारंग माळेकर यांच्यावर हल्ला चढवला.
हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे. एकाच तालुक्यात दोन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. प्रकाश गवई यांच्या कार्यालयात घुसल्यानंतर दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याची एकाने पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वाद आणखी चिघळला. त्यानंतर कार्यालयात जमलेल्या 20 ते 25 जण आपसात भिडले. (Crime News)
एकमेकांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. कार्यालयात घुसलेल्या दुसऱ्या गटातील भाजप पदाधिकाऱ्यांनी हाती जे सापडले त्यानं मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना याचे व्हिडिओ शूट करण्यात आले. या राड्याचे व्हिडिओ ही सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या प्रकरणी आता पक्षाने दखल घेतली असून सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याशी चर्चा करण्यात आल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिव ठाकरे, प्रल्हाद अण्णा लष्कर,अक्षत दीक्षित, चंदन आडलेकर, रोहित सोळंके,विकास लष्कर यांचा समावेश असून या पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.