निवडणूक निकालानंतर अखिलेश यांना काकांचा पहिला धक्का; योगींच्या भेटीनं राजकारण तापलं

विधानसभा निवडणूक पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना निकालानंतर आता मोठा धक्का बसू शकतो.
CM Yogi Adityanath, Shivpal Yadav
CM Yogi Adityanath, Shivpal YadavSarkarnama
Published on
Updated on

लखनौ : विधानसभा निवडणूक (UP Election 2022) पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे (SP) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना निकालानंतर आता मोठा धक्का बसू शकतो. निवणुकीआधी अखिलेश यांच्या आघाडीसोबत असलेले त्यांचे काका शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांच्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारणाचा पारा वाढला आहे. त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिवपाल यादव यांचा प्रगतीशील समाजवादी पक्ष अखिलेश यांच्या आघाडीसोबत आहे. पण मागील काही दिवसांत त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपाल यादव हे मोठ्या संघटनात्मक भूमिकेसाठी आग्रही होते. पण अखिलेश यांच्या सुचना होती की, शिवपाल यांनी सपाच्या समर्थनातून आपल्या राजकीय पक्षाचा विस्तार करावा. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये खडके उडाल्याची चर्चा आहे.

CM Yogi Adityanath, Shivpal Yadav
'काश्मीर फाईल्स'वरून शेवटच्या सभेतच नगरसेवकांमध्ये तुफान राडा

त्यात शिवपाल यांनी बुधवारी योगींची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. बुधवारी त्यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर योगींची भेट घेतली. ही भेट सुमारे अर्धा तास सुरू होती. काही मोठा निर्णय घेणार आहात का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, 'लवकरच सगळ्या मुद्यांवर बोलेन आणि सगळंकाही सांगेन.' या उत्तराने उत्तर प्रदेशातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवपाल यादव त्यादृष्टीने भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

शिवपाल यादव यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी सपामधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. पण त्यानंतरही त्यांची सपातील अनेक नेत्यांशी जवळीक असल्याचे बोलले जाते. ते सहावेळा आमदार राहिलेले आहेत. सपाने 2017 मध्ये 47 तर 2024 मध्ये 125 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे अखिलेश यांना लोकसभेतही चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहेत. त्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत पूर्ण लक्ष राज्यात केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

CM Yogi Adityanath, Shivpal Yadav
ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपच्या बारा तोफा ठरल्या... महाराष्ट्र पिंजून काढणार

माजी मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यांनी आता विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले आहे. त्यामुळे राज्यात योगींच्या विरोधात अखिलेश आक्रमक असतील, हे मानले जात आहे. अखिलेश यांना निवडणुकीपूर्वी घरातूनच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या भावाची पत्नी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने याचा फायदा घेत मुलायमसिंह यादव सपासोबत नसल्याचा प्रचार केल्याचेही सांगितले जाते. आता शिवपाल यांनीही योगींची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com