ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपच्या बारा तोफा ठरल्या... महाराष्ट्र पिंजून काढणार

भाजपच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक बुधवारी मुंबईत झाली. आगामी महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे.
Maharashtra BJP Meeting
Maharashtra BJP MeetingSarkarnama

मुंबई : भाजपच्या (BJP) कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक बुधवारी (ता. 30) मुंबईत झाली. आगामी महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या (Elections) अनुषंगाने बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह बारा नेते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. विधानसभेचे 288 आणि लोकसभेचे 48 मतदारसंघ स्वबळावर लढण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात या नेत्यांच्या तोफा राज्यभर धडाडणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपा प्रदेश कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यांतील विविध विषयांवर कोअर कमिटी सदस्य व पदाधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाली. तसेच आगामी निवडणुकीच्या तयारीसाठीही भाजपनं कंबर कसली असून नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Maharashtra BJP Meeting
अखेर शिवसेनेनं गीतेंचा मान राखलाच; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात दाखवून दिलं...

आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. भाजपच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे दोन लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नेते लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघाचीही तयारी करतील. राज्यातील २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदार संघ एकट्याने लढवण्यासाठी भाजपच्या तयारीला सुरूवात केली आहे.

मतदार संघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी तर दुसरीकडे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक विषयावर भाजप लक्ष केंद्रीत करणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केलं. तसेच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी बारा नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटना बांधणी यावर या नेत्यांचा भर असेल. स्थानिक राजकीय गणिते, स्थानिक राजकारण, लोकसभा निवडणुका पर्यंत पूर्ण योजना या दौऱ्यात होईल, असंही शेलार यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra BJP Meeting
आदित्य ठाकरेंसमोरच खदखद बाहेर; कदम समर्थक आक्रमक झाल्यानं वातावरण तापलं

15 ते 30 एप्रिलदरम्यान महाराष्ट्रभर दौरा

येणाऱ्या काळातल्या सर्व निवडणुका कधी होती अशी शंका आहे. मात्र आम्ही जबाबदारी आणि रणनीती आखली आहे. ता. 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान सर्व नेते राज्यभर प्रवास करणार आहेत. अर्थसंकल्पात एक यशस्वी विरोधी पक्षाची भूमिका आम्ही पार पाडली. विरोधी पक्ष काय असतो, हे आम्ही दाखवलं आहे. आता आम्ही जनसामान्यांचे मुद्दे घेऊन जाणार आहोत, असं शेलार यांनी सांगितलं. ता. 15 एप्रिलपासून मुंबईत पोलखोल अभियानाचीही सुरूवात केली जाणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केलं.

हे नेते महाराष्ट्र पिंजून काढणार

१. देवेंद्र फडणवीस, २. चंद्रकांत पाटील, ३. सुधीर मुंनगंटीवार, ४. पंकजा मुंडे, ५. आशिष शेलार, ६. श्रीकांत भारतीय, ७. चंद्रशेखर बावनकुळे, ८. प्रविण दरेकर, ९. गिरीष महाजन, १०. संजय कुटे, ११. रविंद्र चव्हाण, १२. रावसाहेब दानवे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com