Delhi Assembly Update : ‘जय भीम’चा नारा देणारे आमदार निलंबित, मोदी-मोदी म्हणणारे सुरक्षित!

Opposotion Leader Atishi letter Assembly Speaker Vijender Gupta : विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात उपस्थित सर्व 21 आमदारांना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले.
Delhi Assembly
Delhi AssemblySarkarnama
Published on
Updated on

BJP Government News : दिल्ली विधानसभेतील गोंधळानंतर तीन दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी आम आदमी पक्षाच्या 21 आमदारांना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी थेट अध्यक्षांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी आमदारांना वेगळा न्याय का, असा सवाल त्यांनी केला आहे.

आपचे विधानसभेत 22 आमदार आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात उपस्थित सर्व 21 आमदारांना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. एक आमदार गैरहजर असल्याने ते कारवाईपासून बचावले. त्यानंतर आप आमदारांना गुरूवारी विधानसभेच्या आवारात येण्यापासून पोलिसांनी रोखले. त्यावरून आतिशी यांनी विरोधकांवर अन्याय झाल्याची भावना पत्रातून व्यक्त केली आहे.

Delhi Assembly
Kalyan Singh: उत्तरप्रदेशात हिंदुत्व रुजवणारा भाजपचा सर्वात मोठा चेहरा

आतिशी यांनी पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीची सर्वात मोठी ताकद ही पारदर्शकता आणि समानता ही आहे. पण दिल्ली विधानसभेत मागील काही दिवसांत जे घडले ते विरोधी आमदारांवर अन्यायकारकच नव्हे तर लोकशाही मुल्यांनाही मोठा धक्का आहे. विरोधी आमदारांना रोखले जात असेल तर लोकशाही जिवंत कशी राहील, असा सवाल आतिशी यांनी केला आहे.

विधानसभेत 25 तारखेला नायब राज्यपालांचे भाषण सुरू असताना सत्तासाधी आमदारांनी मोदी-मोदी घोषणा दिल्या जात होत्या. तर विरोधी आमदारांना जय भीमचा नारा दिला जात होता. पण सत्ताधारी आमदारांवर काहीच कारवाई झाली नाही. विरोधी पक्षाच्या 21 आमदारांना मात्र जय भीमचे नारे दिले म्हणून तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले, अशी नाराजी आतिशी यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

Delhi Assembly
Tuhin Kanta Pandey: SEBIच्या अध्यक्षपदी तुहिन कांता पांडे यांची नियुक्ती

तुम्ही अनेक वर्षे विरोधी पक्षनेताही होता. तुम्हाला काही कारणांमुळे सभागृहातून निलंबित केले असले तरी आवारात येण्यापासून आणि गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यापासून कधीही रोखण्यात आले नाही. पण आज विरोधी आमदारांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे, असे आतिशी यांनी पत्रात नमूद केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com