US Peoples Protest against PM Modi: 'मोदी गो बॅक'..; अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या विरोधात नागरिकांकडून निषेध

PM Narendra Modi America Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत.
US Peoples Protest against PM Modi:
US Peoples Protest against PM Modi: Sarkarnama
Published on
Updated on

US Peoples Protest against PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये गुरुवारी (२२ जून) पंतप्रधान मोदींचा पाहुणचार करण्यात आला. यावेळी भाषणातून मोदींनी जो बायडेन यांचे आभार मानले. पण एकीकडे अमेरिका सरकारकडून पंतप्रधांनांचं स्वागत केलं जात असले तरी दुसरीकडे अमेरिकेतील नागरिक पंतप्रधान मोदींविरोधात रस्त्यावर उतरल्याचेही पाहायला मिळाले.

भारतातील हिंसाचार, मानवाधिकार कायद्यांची पायमल्ली, शेतकरी आंदोलन, अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले,काश्मीर प्रश्न यांसारख्या प्रश्नांवरून अमेरिकेतील विविध संघटना आणि नागरिक मोदींविरोधात रस्त्यावर उतरले होते. अमेरिकन नागरिकांनी वेगवेगळ्या घोषणांच्या पोस्टर्समधून मोदींच्या (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्याचाही निषेध केला. ‘ ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’, ‘वर्ल्ड सिख पार्लिमेंट’, देसीस रायझिंग अप अँड मुव्हींग’ (DRUM), ‘क्वीन्स अगेन्स्ट हिंदू फॅसिझम’ अशा विविध संघटनांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा निषेध केला आहे.

US Peoples Protest against PM Modi:
Manisha Kayande Disqualify Petition : मनिषा कायंदेविरोधात ठाकरे गटाची अपात्रतेची याचिका?

‘गो बॅक मोदी’, ‘मोदी नॉट वेलकम’ असे मजकूर असलेले पोस्टर्सच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा निषेधही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या फॅसिस्ट राजवटीतून भारतातील अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप अमेरिकेच्या आंदोलकांनी केला. (PM Narendra Modi America Visit)

इतकेच नव्हे तर, “नरेंद्र मोदी हे पूर्वेतील उगवता हिटलर आहे, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोदींच्या फॅसिझमला खतपाणी घालू नये, मोदींनी अल्पसंख्यांकांन मारणं थांबवावं, मोदी हे खूनी आहेत, भारतीय दहशतवादाचा चेहरा मोदी, हिंदुत्व हे हिंदूंचं वर्चस्व आहे, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर सुरु असलेला अत्याचार त्वरीत थांबवावा, अन्यायकारक शेतकरी कायदे मागे घ्यावेत, अशा आशयाचे पोस्टर्स घेऊन अमेरिकेच्या नागरिकांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलने करताना दिसत आहेत. (Narendra Modinews)

US Peoples Protest against PM Modi:
Patna Opposition Party Meeting : केजरीवालांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा, तर खर्गेंनीही 'आप'ला ठणकावलं !

दक्षिण आशियावर राज्य करण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी त्यांची हिंदुत्ववादी विचारधारा जगभरात पसरवण्याचे काम करत आहेत.तरीही अमेरिकेने मोदींना आणि त्यांच्या फॅसिस्ट विचारसरणीला आमंत्रित का केलं. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारसरणील विरोध करण्यासाठी एकत्रित व्हा. न्यूयॉर्क मोदींच्या आणि त्यांच्या हिंदुत्वाचं समर्थन करत नाही, अशी अमेरिकेतील विविध संघटनांनी हाक दिली आहे. (National News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com