Patna Opposition Party Meeting : केजरीवालांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा, तर खर्गेंनीही 'आप'ला ठणकावलं !

आताची बैठक भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी; तुम्ही थोडी प्रतीक्षा करा...
Patna Opposition Party Meeting
Patna Opposition Party Meeting Mallikarjun Kharge : Arvind Kejariwal
Published on
Updated on

Nationla News : बिहार (Bihar News) राज्याच्या राजधानीच्या पाटणा शहरात आज (२३ जून) रोजी विरोधी पक्षांची बैठक होत आहे. मात्र या बैठकीपूर्वीच विरोधी पक्षांनाच अल्टिमेटम देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना काँग्रेसने आता प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

केंद्र - राज्य संबंधित मोदी सरकार आणू पाहत असलेल्या अध्यादेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या आम आदमी पक्षाला (आप) काँग्रेसने काही काळ प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी संसदेच्या अधिवेशनात पक्ष (Loksabha Session) याबाबत निर्णय घेईल, असे सांगून याबाबत काँग्रेस सकारात्मक असेल की नाही यावर मात्र त्यांनी काहीही भाष्य करायचे टाळले. खरगे यांच्या पवित्र्यानंतर केजरीवाल आता काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Patna Opposition Party Meeting
Shiv Sena Shakha Demolish : 'मातोश्री' जवळील 40 वर्षे जुन्या शिवसेना शाखेवर BMCने फिरवला बुलडोजर ; पालिका म्हणते..

पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीहून निघताना खरगे म्हणाले की, "अध्यादेशाला पाठिंबा किंवा विरोध करण्याचा निर्णय बाहेरून होत नाही. संसदेच्या अधिवेशनादरम्यान सर्व पक्ष एकत्र येऊन अजेंडा ठरवतील. आता भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी ही बैठक आहे. "

"विरोधकांची एकजूट करून हे भाजप सरकार हटवण्याचा आमचा अजेंडा आहे. यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राहुल गांधी यांनी ही सुरुवात केली होती, त्याचाच एक भाग म्हणजे आपण सर्वजण पुन्हा एकदा पाटणा येथे भेटत आहोत," असेही खर्गे म्हणाले.

Patna Opposition Party Meeting
Photo Of Fadnavis On Aadhar Card: आठ वर्षाच्या मुलाच्या आधार कार्डावर चक्कं फडणवीसांचा फोटो; शाळेत प्रवेशही घेतला..

दरम्यान, काँग्रेसने अध्यादेशाला पाठिंबा न दिल्यास आपण सभात्याग करू, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले आहे, याबाबत प्रश्न विचारले असता मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “कदाचित त्यांना स्वतःला माहित असेल की, अध्यादेशाला पाठिंबा किंवा विरोध करण्याचा निर्णय बाहेरून होत नाही, तो संसदेत होतो. संसदेचे अधिवेशन सुरू झाले की, त्याआधी सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन अजेंडा ठरवतात, कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणाला स्वीकारायचं हे ठरवतात."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com