Modi Government : पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; 'RAW'च्या माजी अध्यक्षांना विशेष जबाबदारी!

Modi Government Appoints Former RAW Chief Alok Joshi : केंद्रातील मोदी सरकारने भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल केला आहे.
Former RAW Chief Alok Joshi appointed by Modi Government as Chairman of the National Security Advisory Board, signaling a strategic shift in India’s security framework.
Former RAW Chief Alok Joshi appointed by Modi Government as Chairman of the National Security Advisory Board, signaling a strategic shift in India’s security framework. sarkarnama
Published on
Updated on

Former RAW chief Alok Joshi : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भारता आणि पाकिस्तानमधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलणं सुरू केलं आहे. याच दरम्यान आता मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्रातील मोदी सरकारने भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल केला आहे. माजी RAW प्रमुख आलोक जोशी यांना या मंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्त केले गेले आहे. या मंडळात आणखी सहा सदस्यही असणार आहेत.

Former RAW Chief Alok Joshi appointed by Modi Government as Chairman of the National Security Advisory Board, signaling a strategic shift in India’s security framework.
PM Modi High-Level Meeting : काहीतरी मोठं घडणार! पंतप्रधान मोदींनी बोलावली हायलेव्हल मीटिंग; राजनाथ सिंह, अजित डोवालसह तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख हजर

यामध्ये माजी पश्चिमी एअर कमांडर एअर मार्शल पीएम सिन्हा, माजी दक्षिणी सेना कमांडर लेफ्टनंट जनरल एके सिंह आणि रियर अ‍ॅडमिरल मॉन्टी खन्ना तसेच, सैन्य सेवेतून निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंह भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झालेले दोन सदस्य आहेत. याशिवाय आयएफएसमधून सेवानिवृत्त झालेले बी. व्यंकटेश वर्मा हे देखील सातवे सदस्य असणार आहेत.

Former RAW Chief Alok Joshi appointed by Modi Government as Chairman of the National Security Advisory Board, signaling a strategic shift in India’s security framework.
Khawaja Asif : 'अब आया ऊँट पहाड़ के नीचे' ; अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यास भारताने आणलं वठणीवर!

हा निर्णय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला गेला आहे. ज्यामध्ये एका नेपाळी नागरिकासह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला व अनेकजण जखमी झाले. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या सीसीएस बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

Former RAW Chief Alok Joshi appointed by Modi Government as Chairman of the National Security Advisory Board, signaling a strategic shift in India’s security framework.
Top Ten News : ''भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानी सैन्य अलर्टवर'' ; पहलगाममधील हल्ल्यानंंतर अबू आझमींचा गंभीर आरोप - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

भारताने या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने भारताकडून पाकिस्तानविरोधात विविध कडक पावलं उचलली जात आहेत. त्यात आता भारताने अणवस्त्र हल्ल्याची बाता मारणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाही चांगलाच झटका दिला आहे. कारण, भारताने ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकाउंट भारतात बॅन केलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com