
Pahalgam terror attack and PM Modi High-Level meeting : जम्मू-काश्मीरमच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता भारताने दहशतवादी आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता नवी दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीस केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्यासही तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख हजर आहेत. जवळपास तासभरापासून सुरू असलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत भारताची आगामी रणनीती आणि सैन्य दलाच्या तयारीचा आढावा घेतला जात असल्याचं बोललं जात आहे.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण आहे, तर जगभरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला आहे. तर पंतप्रधान मोदींनीही या हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया देत, कल्पनाही केली नसेल असे प्रत्युत्तर दिले जाईल, असा कडक इशारा दिलेला आहे.
यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली गेली आहेत आणि आणखी काही कठोर निर्णय देखील घेतले जात आहेत. हे पाहता पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य दल चांगलेच धास्तावले असल्याचेही दिसून येत आहे. शिवाय, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भारताचे तिन्ही सैन्य दल कोणत्याही क्षणी प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे सांगितलेले आहे.
एवढंच नाहीतर भारत कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनीच बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या या उच्चस्तरीय बैठकीमुळे भारत लवकरच काहीतरी मोठं पाऊल उचलू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.