Manmohan Singh Memorial : मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी सरकारचं मोठं पाऊल; ‘या’ तीन जागांचे पर्याय

Modi Government Congress Prime Minster Memorial options : मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा द्यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती.
Manmohan Singh
Manmohan SinghSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिले होते. ज्याठिकाणी स्मारक उभारता येईल, तिथेच मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. पण मोदी सरकारने ही मागणी मान्य केली नव्हती.

आता केंद्र सरकारने स्मारकासाठी तीन जागांची पाहणी केल्याचे समोर आले आहे. या तीन जागांचे पर्याय कुटुंबाला सुचवण्यात आले असून त्यापैकी एक जागा निश्चित करण्यास सांगितले आहे. ही जागा अंतिम झाल्यानंतर लगेचच स्मारक उभारण्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी स्मारकासाठी ट्रस्टची स्थापनाही करावी लागणार आहे.

Manmohan Singh
Modi Government : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’; खतांच्या किंमतींबाबत मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या धोरणानुसार, स्मारकासाठी दिली जाणार जमीन केवळ संबंधित ट्रस्टला दिली जाते. ट्रस्ट तयार झाल्यानंतरच स्मारक उभारणीचे काम सुरू होई शकते. ट्रस्टकडून स्मारकाच्या जमिनीसाठी अर्ज केला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारचा संबंधित विभाग आणि ट्रस्टमध्ये जमिनीबाबत करार होईल.

मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मृती स्थळ आणि किसान घाट या तीन ठिकाणांजवळच्या जागेचे पर्याय सुचविण्यात आल्याचे समजते. याठिकाणी स्मारकासाठी सुमारे दीड एकर जागा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. नगर विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राजघाट आणि त्याजवळच्या परिसराची पाहणी केली आहे. त्यामुळे त्याचठिकाणी स्मारक होण्याची शक्यता अधिक आहे.

Manmohan Singh
Tahawwur Rana Extradition : भारताची 15 वर्षांपासूनची प्रतिक्षा संपली; मुंबई हल्ल्यातील आरोपी राणाच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा

मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी नेहरू-गांधी कुटुंबातील नेत्यांच्या समाधीच्या जवळपास जागा दिली जाऊ शकते. याठिकाणी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि संजय गांधी यांची समाधी आहे. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाकडूनही जमिनींच्या पर्यायाबाबत केंद्र सरकारने मत मागवले आहे. त्यामुळे यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनमोहन सिंग यांचे निधन 26 डिसेंबरला वयाच्या 92 व्या वर्षी झाले. त्यांच्यावर 28 डिसेंबरला दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com