Modi Ka Parivar : भाजप नेत्यांच्या बायोमध्ये अचानक 'मोदी का परिवार' !

Modi on Lalu : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी मै चौकीदार हुँ चा नारा दिला होता. लालूप्रसाद यादव यांनी मोदींना हिंदू नाही त्यांचा परिवार नाही, अशी टीका केल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी मोदी का परिवार, अशी भूमिका घेत इंडिया आघाडीला कोंडीत पकडले आहे.
lalu prasad yadav, Modi ka Parivar
lalu prasad yadav, Modi ka Parivar Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा एखादा नारा, आरोप हे दुसऱ्या पक्षाच्या अचानक हिताचे ठरते. राजकारणात असे अनेकदा झाले आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' असा नारा दिला होता.

त्यानंतर 'मै चौकीदार हूँ' अशी मोहीम भाजपने राबविली होती. अगदी तशीच चूक 2024 च्या निवडणुकीपूर्वी लालूप्रसाद यादव यांनी केली. त्यांनी मोदींच्या परिवारावर वैयक्तिक टीका टिप्पणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला प्रत्युत्तर देताना 'माझ्यासाठी संपूर्ण देश परिवार' आहे असे ठामपणे सांगितले. पंतप्रधानाने संपुर्ण देशाला परिवाराचा भाग संबोधल्यानंतर भाजप च्या ज्येष्ठ नेत्यांनी 'मोदी का परिवार' ही मोहिम राबविणे सुरु केले आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी आणि ते मोदी परिवाराचा हिस्सा आहे हे दाखविण्यासाठी आज मीडिया हँडल 'एक्स'वर 'मोदी का परिवार' असा बदल बायोमध्ये केला आहे.

यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शाह, जे.पी. नड्डा, पीयूष गोयल यांच्यासह राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदींनी त्यांचे बायो बदलले आहे.

शनिवारी लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर त्यांच्या कुटुंबाबाबत वैयक्तिक टीका टिप्पणी केली होती. आज पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण देश त्यांचे कुटुंब आहे. त्यानंतर आज भाजपच्या नेत्यांनी त्यांचे मीडिया हँडल 'एक्स'वर त्यांच्या नावासमोर मोदी का परिवार हे वाक्य जोडत लालूप्रसाद यादव यांना चांगलीच चपराक लगावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

lalu prasad yadav, Modi ka Parivar
Eknath Shinde On Manoj Jarange : जरांगे-पाटील अजूनही नाराज का आहेत? मुख्यमंत्री उत्तर देत म्हणाले...

लोकसभा निवडणुकीपूर्वी घराणेशाहीचा नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाने शनिवारी पाटणा येथील गांधी मैदानावर जनविश्वास रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत इंडिया आघाडीच्या रॅलीत अनेक बडे नेते सहभागी झाले होते.

बिहारमधील जनतेला संबोधित करताना लालू यादव यांनी नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका केली आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत लालू यादव म्हणाले होते, "नरेंद्र मोदी आजकाल घराणेशाहीवर बोलत आहेत. तुमचे कुटुंब नाही. तुम्ही हिंदूही नाही." पाटणा येथील सभेला संबोधित करताना लालूप्रसाद यादव म्हणाले "कोण मोदी ? 2024 मध्ये ते (मोदी सरकार) उलथून टाकतील," असा दावा त्यांनी केला.

लालूप्रसाद यादव यांच्या या विधानावर पंतप्रधान मोदींनी आज जोरदार प्रहार केला. तेलंगणातील आदिलाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, "माझ्या कुटुंबामुळे मला लक्ष्य करण्यात आले. पण आता संपूर्ण देश म्हणत आहे की मी मोदींचे कुटुंब, परिवार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी सोशल मीडिया हँडलवरील बायो बदलला आहे. अमित शाह, पीयूष गोयल, नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदींनी 'एक्स' या मीडिया हँडलवरून त्यांचे बायो बदलले आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी भ्रष्टाचार, घराणेशाहीत इंडिया आघाडीचे नेते आकंठ बुडाले असून, ते अस्वस्थ झाले आहेत. आता विरोधकांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा खरा अजेंडा समोर केला आहे.

जेव्हा मी त्यांच्या घराणेशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तेव्हा हे लोक मोदींना कुटुंब नाही असे म्हणत फिरत असल्याचे मोदी म्हणाले. उद्या ते असेही म्हणू शकतील की तुम्हाला कधीही तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही, त्यामुळे तुम्ही राजकारणात येऊ शकत नाही. असे नवे उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देत थेट चारा घोटाळ्यातील आरोपी लालूप्रसाद यादव यांना लक्ष्य केले.

R

lalu prasad yadav, Modi ka Parivar
Mahavitaran Bharti 2024: महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी; 5347 जागा भरण्यास सुरुवात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com