PM Modi News : 'मी पण गच्चीवर जाऊन पतंग उडवायचो...' मोदींनी दिला आठवणींना उजाळा!

PM Modi on Sankranti : जाणून घ्या, मकर संक्रातबाबत नेमकं काय म्हणाले आहेत पंतप्रधान मोदी? ; 'मिशन मौसम'ची सुरुवात केली.
PM Modi on Sankranti
PM Modi on SankrantiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi in Bharat Mandapam : पंतप्रधान मोदींनी मंगळवारी भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या 150 व्या स्थापना दिवसाच्या निमित्त, देशाला प्रत्येक ऋतू आणि वातावरणाचा सामना करण्यासाठी स्मार्ट राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने मिशन मौसमची सुरुवात केली गेली.

भारत मंडपममध्ये आयोजित समारंभात सहभागी होवून, पंतप्रधान मोदींनी IMDच्या 150व्या स्थापना दिवसावर एक स्मारक शिक्काही जारी केला. नंतर संबोंधनात त्यांनी मकर संक्रातीचाही उल्लेख केला आणि त्यांच्या बालपणातील आठणींना उजाळा दिला आणि म्हटले.

पंतप्रधान मोदी(PM Modi) म्हणाले, १८५७ मध्ये १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आयएमडीची स्थापना केली गेली होती. आम्ही सर्वजण भारतात मकर संक्रांतीस किती महत्त्व आहे हे जाणतो. मी गुजरातचा आहे आणि माझा आवडात सण मकर संक्रात होता. आज गुजरातमधील लोक आपल्या गच्चीवर जातात आणि पतंग उडवतात, मी देखील हेच करत होतो. आज सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि हळूहळू उत्तरेकडे सरकतो या प्रक्रियेस उत्तरायण म्हटले जाते.

पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात म्हटले की, आज आपण भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDचे 150वे वर्ष साजरा करत आहोत. ही केवळ भारतीय हवामान विभागाची यात्रा नाही. ही आमच्या भारतातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचीह यात्रा आहे. आयएमडीने केवळ कोट्यवधी भारतीयांची सेवा केलेली नाही, तर भारताच्या वैज्ञानिक यात्रेचेही प्रतीक बनले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, यामुळेच मागील दहा वर्षांत आयएमडीच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे.

पंतप्रधान मोदींनी म्हटले की, बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी भारत एक स्मार्ट राष्ट्र बनावे, यासाठी आम्ही मिशन मौसम देखील सुरू केले आहे. त्यांनी म्हटले की, मिशन मौसम भक्कम भविष्य आणि भविष्यातील तयारीबाबत भारताच्या कटीबद्धतेचेही प्रतीक आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com