मॉन्सूनचा सांगावा...तयारीला लागा! : यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस

जून ते सप्टेंबर या कालावधीतील हा पावसाचा अंदाज आहे.
Monsoon forecast
Monsoon forecastSarkarnama

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (India Meteorological Department) आज (ता. १४ एप्रिल) बळीराजाला पर्यायाने संपूर्ण देशाला एक आनंदवार्ता दिली आहे. मॉन्सूनचा (Monsoon) पहिला अंदाज ‘आयएमडी’कडून जाहीर करण्यात आला आहे, त्यानुसार सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. तो चांगला पाऊस मानला जातो. जून ते सप्टेंबर या कालावधीतील हा पावसाचा अंदाज आहे. (IMD forecasts 99 percent of the average rainfall this year)

कोरोना, कोसळलेले बाजारभाव, डिझेल व रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती यासारख्या नकारात्क बातम्यांमध्ये पावसाच्या अंदाजाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. ‘आयएमडी’चा हा पहिला अंदाज असून काही दिवसानंतर आणखी एक अंदाज जाहीर करण्यात येतो. तो आणखी काटेकोर असतो. आजच्या मॉन्सूनच्या अंदाजाने शेतकऱ्यांना एक प्रकारे मशागतीच्या कामाला लागण्याचा सांगावाच दिल्याचे मानले जात आहे.

Monsoon forecast
केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार करण्याचा शब्द देणाऱ्या सोनवणेंना अजितदादा कोणते बक्षीस देणार?

देशाची बहुअंशी अर्थव्यवस्था ही शेती व प्रक्रिया उद्योगावर अवलंबून आहे, त्यामुळे ही आनंदवार्ता एकूणच देशवासियांसाठी दिलासादायक ठरणार आहे. वर्षभरात जो पाऊस पडतो, त्याच्या ७४ टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडत असतो. त्यामुळे ‘आयएमडी’चा हा अंदाज आगामी खरीप आणि रब्बी हंगामासाठी लाभदायीच ठरणार आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही विषय चांगला पाऊस झाल्यास मार्गी लागणार आहे.

मॉन्सूनच्या अंदाजाच्या प्रतीक्षेत देशभरातील शेतकरी असतात. तो काय असणार, याची उत्सुकता संपूर्ण देशालाच लागून राहिलेली असते. आज ती प्रतीक्षा संपलेली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने १९७१ ते २०२० पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीच्या आधारे जाहीर केलेला आहे. ‘आयएमडी’कडून चांगल्या पावसाचा अंदाज आल्याने देशभरातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची करण्याच्या कामाला सुरुवात करतील. येत्या जूनपर्यंत खरिपातील पेरणीसाठी शेतं तयार करून ठेवतील.

Monsoon forecast
आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

खासगी संस्था असलेल्या ‘स्कायमेट’नेही ‘यंदा मान्सून सामान्य राहिल,’ असा अंदाज काही दिवसांपूर्वीच वर्तविलेला आहे. ‘स्कायमेट’ने वर्तविलेल्या अंदाजामध्ये जून ते सप्टेंबरच्या कालावधीत संपूर्ण देशभरात सरासरीच्या ९८ टक्के मॉन्सून राहणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये पाच टक्क्यांपेक्षा कमी किंवा जादा पावसाचा अंदाज असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com