Karnataka Next CM : कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण...? सुशीलकुमार शिंदेंवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत.
D. K. Shivakumar-Sushilkumar Shinde-Siddaramaiah
D. K. Shivakumar-Sushilkumar Shinde-Siddaramaiah Sarkarnama

सोलापूर : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३६ जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. तो तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने पक्षनिरीक्षक म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. (Who is Chief Minister of Karnataka...? Sushilkumar Shinde has been given a big responsibility by Congress)

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी या नियुक्तीला दुजोरा दिला आहे. कर्नाटकचा (Karnataka) मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा (Chief Minister) तिढा सोडविण्याची मोठी जबाबदारी शिंदे आणि त्यांच्या दोन जोडीदारांवर टाकण्यात आलेली आहे.

D. K. Shivakumar-Sushilkumar Shinde-Siddaramaiah
Karnataka Chief Minister : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे मोठे विधान

कर्नाटकात आता सत्तास्थापनेला वेग आलेला आहे. त्यामुळेच पक्षनिरीक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांच्यासोबत दोन सहनिरीक्षकही असणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईपर्यंत शिंदे हे बंगळूरूमध्येच असणार आहेत. कर्नाटक काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही शिंदे यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

D. K. Shivakumar-Sushilkumar Shinde-Siddaramaiah
Karnataka Election Result : एकही दिवस प्रचार न करता...मतदारसंघात न जाताही मिळविला काँग्रेस उमेदवाराने विजय

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गांधी कुटुंबीयांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे, त्यामुळे गांधी कुटुंबीयांबरोबरच बंगळूरूमध्ये काय घडतंय, याकडे संपूर्ण कर्नाटकाचे लक्ष लागले आहे.

D. K. Shivakumar-Sushilkumar Shinde-Siddaramaiah
Karnataka Women MLA : कर्नाटकच्या २२४ आमदारांच्या विधानसभेत पोचल्या अवघ्या दहा जणी!

काँग्रेसने तब्बल १० वर्षांनंतर कर्नाटकात स्वबळावर सत्ता मिळविली आहे. या यशाचे अनेक वाटेकरी असले तरी थेट मैदानावर लढण्यापर्यंतची जबाबदारी शिवकुमार आणि सिद्धरमय्या यांनी पार पाडली आहे. त्यामुळेच या दोघांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून या दोघांची नावे चर्चिली जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हेही कर्नाटकचेच आहेत. त्यामुळे त्यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. निर्णय जरी गांधी कुटुंबीय घेणार असले तरी नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून घेतली जातील, त्याबाबतचा ठराव हायकमांडकडे पाठविला जाईल. त्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, हे कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com