Prime Ministers Election Survey : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास एक वर्ष उरले असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यासाठी भाजपने राजकीय समीकरणेही बांधण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना केंद्रात सत्तापालटाची आशा आहे. असे असतानाच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
सी-व्होटर आणि इंडिया टुडे यांच्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य उमेदवाराबाबत लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या सर्वेक्षणाचे निकाल आणि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. गेल्या प्रदीर्घ काळापासून पंतप्रधान मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले होते.
राहुल गांधी लोकांची पसंती कशी?
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा फायदा त्यांच्या लोकप्रियतेवर होताना दिसत आहे. पंतप्रधानपदासाठी सर्वोत्कृष्ट उमेदवार कोण असेल या प्रश्नाला उत्तर देताना 14 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या बाजूने कौल दिला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या याच सर्वेक्षणात केवळ 9 टक्के लोकांनी काँग्रेस नेत्याला पंतप्रधानपदासाठी पसंती दिली होती.
मोदींची लोकप्रियता किती कमी झाली?
पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवाराचा प्रश्न जेव्हा लोकांना विचारण्यात आला तेव्हा ५२ टक्के लोक नरेंद्र मोदींच्या बाजूने दिसले. तर, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अर्ध्याहून अधिक लोकांचा पंतप्रधानपदाच्या संदर्भात नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात पीएम मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा आकडा ५३ टक्के होता. दोन्ही सर्वेक्षणांची तुलना केल्यास असे दिसून आले आहे की पीएम मोदींच्या लोकप्रियतेत 1 टक्क्यांनी घट झाली आहे.
पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचे योग्य उत्तराधिकारी म्हणून आघाडीवर असलेले, सर्वेक्षणाने जनतेचा मूड सांगितला. या सर्वेक्षणात अमित शहा, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांच्या नावांचा समावेश होता. सर्वेक्षणानुसार, 26 टक्के लोकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी म्हणून पाठिंबा दिला आहे. त्याच वेळी, 25 टक्के लोक यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पाहतात. या सर्वेक्षणात नितीन गडकरींच्या समर्थनार्थ केवळ 16 टक्के लोकांनी तर राजनाथ सिंह यांना 6 टक्के लोकांनी आपली पसंती दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.