Mohammed Yunus News : बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले अन् अत्याचारांवर मोहम्मद यूनुस यांनी सोडलं मौन, म्हणाले...

Attacks on Hindus continue in Bangladesh : जाणून घ्या, आंदोकांना काय म्हणाले आहेत? ; बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदूंच्या घरांवर तसेच धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत, याविरोधात सर्व स्तरातून चिंता व्यक्त होत आहे.
Mohammed Yunus
Mohammed YunusSarkarnama
Published on
Updated on

Mohammed Yunus and Bangladeshi Hindu : बांगलादेशच्या अंतिरम सरकारचे प्रमुख नोबेल विजेते डॉ. मोहम्मद यूनुस यांनी देशात धार्मिक अल्पसंख्याक समुदायांवर, विशेष करून हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारांची आणि हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मोहम्मद यूनुस यांनी याला घृणास्पद कृत्य म्हटलं आहे.

तसेच यूनुस यांनी शेख हसीना(Sheikh Hasina) यांच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांकांच्या विरोधातील हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले, 'ते(अल्पसंख्याक) या देशाचे नागरिक नाहीत का? तुम्ही(विद्यार्थी) हा देश वाचवण्यास सक्षम आहात. तुम्ही काही कुटुंबाना वाचवू शकत नाही का?' रंगपूर शहरात बेगम रुकैया विद्यापिठात विद्यार्थ्यांशी ते बोलत होते.

मोहम्मद यूनुस यांनी विद्यार्थ्यांना सर्व हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध परिवारांना वाचवण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, 'तुम्ही म्हणायला हवं, कोणीही त्यांना(अल्पसंख्यांकांना) नुकसान पोहचवू शकत नाही. ते आमचे बांधव आहेत. आम्ही एकत्रितपणे लढाई लढली आणि आम्ही एकत्र राहू. '

Mohammed Yunus
Narendra Modi and Muhammad Yunus : मोहम्मद यूनुस यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा अन् बांगलादेशातील हिंदूंच्या सुरेक्षेचा मुद्दाही मांडला!

तसेच, 'पुढे यूनुस(Mohammed Yunus) यांनी म्हटले की, तुमचं यश धुळीस मिळवण्यासाठी अनेकजण उभे आहेत. मात्र यावेळी तुम्ही पडू नका. बांगलादेशास एक परिवार म्हणत ते म्हणाले की, हा बांगलादेश आता तुमच्या हातात आहे. तुम्ही याला कुठे नेवू इच्छित आहात?, तुम्हा याला हवं तिथे नेवू शकतात. तुमच्याकडे ती ताकद आहे, हा काही संशोधनाची विषय नाही.'

5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यापासून आणि देश सोडल्यापासून बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर विशेष करून हिंदूंवर आणि त्यांच्या ठिकाणांसह धार्मिक स्थळांवर हल्ले सुरू आहेत. यामुळे अनेक जणांना सर्व काही सोडून जीव वाचवण्यासाठी पळ काढवा लागला आहे.

Mohammed Yunus
Asaduddin Owaisi on Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांवर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

बांगलादेशातील(Bangladesh) अराजकतेच्या पार्श्वभूमीवर हजारो बांगलादेशी हिंदू भारतात येण्याचाही प्रयत्न करत आहेत. शनिवारी चिटगांवमधील हल्ल्यांच्या विरोधात हिंदू समुदायाकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने केली गेली. ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. याशिवाय ढाका येथील शाहबाग चौकातही सलग दुसऱ्या दिवशी हिंदू समुदायाचे लोक आपल्या सुरक्षेची मागणी करत, मोठ्या संख्येने एकत्रित जमले होते. बांगलादेशात हिंदू सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com