Monsoon Session: पुन्हा खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधींनी मानले अध्यक्षांचे आभार; घाबरु नका, आज मी अदानींवर बोलणार नाही..

No Confidence Motion : आज मी फार टीका करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरवात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर ते आज पहिल्यांदा लोकसभेत बोलत होते.

अध्यक्षांना ते म्हणाले, "लोकसभेत मला पुन्हा घेतलं म्हणून मी आपला आभारी आहे," "आज मी अदानींवर बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही घाबरू नका, सत्ताधारी आज शांत राहू शकतात, आज मी फार टीका करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
Sanjay Raut Questions PM Modi: ...म्हणून तुम्ही राष्ट्रवादी फोडली?; राऊतांचा मोदींवर घणाघात; अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून कोणी रोखले?

त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीला सत्ताधाऱ्यांनी गदारोळ केला. १३६ दिवसांनी त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ते सभागृहात बोलत होते.

मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर मंगळवारपासून संसदेत चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, संसदेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला.

Rahul Gandhi
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा ; 'ते' तुमच्यावर टीका करतील, तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्वप्न पूर्ण करा..

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) लोकसभेत बोलताना राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार अरविंद सावंत यांना खाली बसण्यास सांगताना नारायण राणेंची जीभ घसरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com