Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा ; 'ते' तुमच्यावर टीका करतील, तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्वप्न पूर्ण करा..

August Kranti maidan : महाराष्ट्र हे क्रांतीकारकाचे राज्य आहे.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarkana
Published on
Updated on

Mumbai News : ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक करताना मुंबईतील खड्ड्यांवर त्यांनी भाष्य केले.

"ते आपल्या शेजारीच बसले आहेत. तुमच्यावर बोट उचलण्याचा प्रयत्न करतील, तुमच्यावर टीका करतील, पण मुख्यमंत्र्यांचे खड्डे मुक्त मुंबईचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा," असे फडणवीसांनी मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल चहल यांना सांगितले.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Someshwar Sugar Factory: अमित शाह यांच्यासमोर सांगितलेला शब्द अजितदादांनी खरा केला ; 'सोमेश्वर'कडून 3350 रुपये दर जाहीर

ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृती स्तंभाला अभिवादन केले. याच ऑगस्ट क्रांती मैदानावरून ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधीजींनी इंग्रजांना 'चले जाव'चा इशारा दिला होता. त्यानंतर इंग्रजांविरोधात देशभरामध्ये वातावरण पेटलं होते या दिवसाची आठवण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदानावर सरकारच्याकडून याकार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
PM Modi Big Statement : ठाकरेंनी युती तोडली, आम्ही नाही," ; NDA च्या बैठकीत मोदींचा पलटवार

फडणवीस म्हणाले,"स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपण आहोत. त्यांना नमन करण्याचा हा दिवस आहे. इंग्रजाची एकही खूण आपल्याला नको, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील राजपथचे नाव 'कर्तव्यपथ' असे केले. इंग्रजाच्या सर्व खुणा आपल्याला पुसून टाकायच्या आहेत,"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "इंग्रजाच्या विरोधात स्वातंत्र्यसैनिक लढले. त्यांच्या बलिदानामुळे आपण हा दिवस आज पाहतो आहे. स्वदेश, स्वाभिमान हा मंत्र त्यांनी दिला. महाराष्ट्र हे क्रांतीकारकाचे राज्य आहे," अजित पवार यांचेही यावेळी भाषण झाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com