मूड महाराष्ट्राचा : शिवसेनेचे पारडे पालघरमध्ये जड तर ठाण्यात भाजपसोबत टक्कर

आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे
Mood of Maharashtra
Mood of Maharashtra Sarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. यात पालघरमध्ये शिवसेनेचे(Shivsena) पारडे जड राहील, असे समोर आले आहे. याचवेळी ठाण्यात शिवसेनेला भाजपसोबत झुंजावे लागेल.

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली आहे. राज्याच्या इतिहासातील ही एक आगळी घडामोड होती. दोन वर्षे सरकार टिकेल का, अशी शंका व्यक्त केली जात होती. तीन पक्षांचे सरकार शंका लोकांना मान्य होईल का, अशीही शक्यता व्यक्त होत होती. आता सरकारला दोन वर्षे झाली याबद्दल जनतेला काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील सर्व घटकांचा कल जाणून घेतला आहे.

ठाणे जिल्ह्यात भाजप-शिवसेनेची टक्कर असेल. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी(Maha Vikas Aghadi) होण्याची शक्यता कमी आहे. तरीही काही जागांवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत लढण्याची शक्यता आहे किंवा मैत्री पूर्ण लढत होईल. सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनेला नाराजीचा सामना करावा लागणार. जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वावर नाराजी दिसते. पक्षांतर्गत नाराजीचा फटका शिवसेना व काँग्रेसला सर्वाधिक बसण्याची शक्यता आहे. सध्या १८ पैकी ८ भाजपचे, शिवसेनेचे ६, राष्ट्रवादीचे २ आणि अपक्ष, मनसे(MNS) प्रत्येकी एक आमदार आहेत. काँग्रेसचा एकही आमदार नसून आगामी निवडणुकीतही काँग्रेसला जागा मिळण्याची शक्यता नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फारसे महत्त्व नसेल. मनसेमुळे मराठीबहुल मतदार संघात मते विभागली जातील. पण त्याची टक्केवारी कमी असल्याने शिवसेनेला फारसा फटका बसणार नाही. मात्र कल्याण ग्रामीण, शहापूरमध्ये अंतर्गत गटाबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडी, एमआयएम पक्षांचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल. भाजपला ऐरोली, बेलापूर, कल्याण पूर्वमध्ये फटका शक्य आहे. राष्ट्रवादीला शहापूरला फटका बसेल, पण ही जागा उल्हासनगरमुळे भरून निघण्याची शक्यता आहे. कल्याण ग्रामीणची एकमेव जागा ‘मनसे’च्या हातून जाऊ शकते. पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे पारडे जड होते. निवडणुका झाल्यास पालघर जिल्ह्यात शिवसेनेकडे मतदारांचा कल अधिक राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत काही जागांवर महाविकास आघाडी आपापसात चर्चा करून उमेदवार उभे करू शकते. शिवसेनेने कोरोना काळात जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यामुळे अनेक प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ६ मतदारसंघांपैकी ३ बहुजन विकास आघाडीकडे आहेत, तर प्रत्येकी एक हे सीपीएम, राष्ट्रवादी व शिवसेनेकडे आहेत.

Mood of Maharashtra
मूड महाराष्ट्राचा : आज निवडणुका झाल्यास मुंबईचा बालेकिल्ला शिवसेना राखणार

बोईसर मतदारसंघात सध्या बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील आहेत. बहुजन विकास आघाडीला सोडचिट्ठी देत शिवसेनेतून उमेदवारी मिळवलेले विलास तरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या तीन जागा विलास तरे यांनी शिवसेनेला मिळवून दिल्या आहेत. पक्षबांधणी आणि मतदारांची कामे याकडे कल दिसत असल्याने बहुजन विकास आघाडीला फटका बसू शकतो.

Mood of Maharashtra
मूड महाराष्ट्राचा : सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप सगळ्यात मोठा पक्ष

पालघर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा हे शिवसेनेकडून निवडून आले. भविष्यात युती झाल्यास गटबाजी होण्याची शक्यता आहे. डहाणू येथे सीपीएमला खिंडार पाडणे शक्य होणार नाही. त्यामुळे येथे महाविकास आघाडी एकत्र येत उमेदवार देऊ शकते. जेणेकरून मत विभाजन होणार नाही व फायदा मिळेल. नालासोपारा मतदारसंघाकडे पाहता बहुजन विकास आघाडीच्या विकास कामांकडे मतदारांचा कौल आहे. क्षितिज ठाकूर विविध विकासकामांच्या जोरावर गड राखून ठेवतील. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा हा बालेकिल्ला आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढली तरी महाविकास आघाडीकडे विधानसभा उमेदवारीसाठी चेहरा नाही. त्यामुळे हा गड ठाकूर यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com