Brij bhushan Singh News : खासदार ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणी वाढणार? कुस्तीपटू 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत...

Delhi Jantar Mantar News : ''आमची लढाई केवळ FIR नोंद होईलपर्यंत नसून....''
Brij Bhushan Singh,2023 Indian wrestlers Protest
Brij Bhushan Singh,2023 Indian wrestlers ProtestSarkarnama
Published on
Updated on

Brij Bhushan Sharan Singh Case:  भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण जोपर्यंत सिंह यांना सर्व पदावरुन हटवून तुरुंगात टाकत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका भारतीय कुस्तीपटूंनी घेतली आहे. यासाठी गेल्या 28 दिवसांपासून जंतरमंतरवर कुस्तीपटू निदर्शनं करत आहेत. आता कुस्तीपटूंचा संयम सुटला असून आक्रमक पवित्रा घेत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते एकीकडे आज (दि.28 ) नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात येत आहे. तर जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या समर्थनार्थ आज नव्या संसद भवनाबाहेर खाप पंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुस्तीपटू गेल्या 28 दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणीसाठी आक्रमक झाले आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Brij Bhushan Singh,2023 Indian wrestlers Protest
Brij Bhushan Sharan Singh Case: पैलवान अन् पोलिसांमध्ये मध्यरात्री 'दंगल'; विनेश फोगाट,साक्षी मलिक यांना रडू कोसळलं

भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेची मागणी आंदोलनकर्ते कुस्तीपटू करत आहेत. मात्र, अद्याप गुन्हा दाखल केल्याखेरीज कोणतीही कारवाई सिंह यांच्यावर करण्यात आलेली नाही. तसेच मोदी सरकारमधील कोणत्याही मंत्री, अधिकार्याने या आंदोलनाला गांभीर्यानं घेतलेलं नाही.

याच पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी शनिवारी (दि.27 ) रात्री उशिरा सरकारवर गंभीर आरोप करत महापंचायत होऊ नये यासाठी शासन आमच्यावर दबाव आणत असल्याचं म्हटलं. मात्र, आपण मागे हटणार नसल्याची स्पष्ट केलं आहे. याचवेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेते या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत.

Brij Bhushan Singh,2023 Indian wrestlers Protest
Wrestlers Protest At Jantar Mantar: जंतरमंतरवर मोठा गोंधळ; बॅरिकेड्स तोडून शेतकऱ्यांचं कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन, पाहा व्हिडीओ

विनेश फोगटनं केलं हे आवाहन...

कुस्तीपटू विनेश फोगाट(Vinesh Phogat), साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासहित इतर कुस्तीपटूही आंदोलनात सहभागी झाले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात FIR दाखल झाल्यानंतर कुस्तीपटू आंदोलन मागे घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण कुस्तीपटू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सिंह यांना सर्व पदावरुन हटवण्यात येईल, सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास असल्याचं विनेश फोगाटने म्हटलं आहे. पदावर राहिल्यास ते पदाचा गैरवापर करु शकतात, आमची लढाई केवळ FIR नोंद होईलपर्यंत नसून ब्रिजभूषणला सजा मिळेपर्यंत आहे असं विनेश फोगाटनं स्पष्ट केलं आहे.

Brij Bhushan Singh,2023 Indian wrestlers Protest
Brij Bhushan Singh: २२ दिवसांनंतर आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंचा संयम सुटला; ब्रिजभूषण सिंहांविरोधात उचललं 'हे' मोठं पाऊल

तसेच महिला सन्मान महापंचायत रविवारी होणारच आहे. संपूर्ण दिल्लीत पोलिसांनी गस्त घातली आहे, पण आम्ही सर्वांना महिला सन्मान महापंचायतीत सहभागी होण्याचं आवाहन करतो. यावेळी कुस्तीपटू विनेश फोगट असं म्हटलं आहे.

नार्को चाचणीसाठी तयार...

लैंगिक शोषणाचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंचे (Wrestlers) दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंना नार्को टेस्टचे आव्हान दिले आहे. हे आव्हान कुस्तीपटूंनी देखील स्विकारले आहे. यावेळी सिंह म्हणाले, "ज्या खेळाडूंनी आरोप लावले आहेत, त्यांनी त्यांची नार्को टेस्ट करायला आपल्या सहमतीचं पत्र कपिल सिब्बल यांना पाठवलं आहे." तसेच, मी देखील माझ्या सहमतीचे पत्र सिब्बल यांना पाठवणार असल्याचं सिंह यांनी सांगितलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com