MP - Chhattisgarh Voting : दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत कैद; मध्य प्रदेशात 71 टक्के, तर छत्तीसगडमध्ये 68 टक्के मतदान!

Assembly elections : दोन्ही राज्यांमध्ये मतदानादरम्यान काही हिंसक घटनाही घडल्या, मात्र मतदारांनी दाखवला उत्साह
Assembly elections
Assembly electionsSarkarnama
Published on
Updated on

MP - Chhattisgarh Election News : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मध्य प्रदेशातील सर्व 230 आणि छत्तीसगडमधील उर्वरित 70 जागांसाठी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पूर्ण झाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात 68.15 टक्के मतदान झाले असून, मध्य प्रदेशात एकूण 71.16 टक्के मतदान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Assembly elections
Chhagan Bhujbal : बीडमध्ये 'त्या' दिवशी नेमकं काय आणि कसं घडलं?, भुजबळांनी सांगितला घटनाक्रम, म्हणाले...

मध्य प्रदेशमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम रंजन यांनी सांगितले की, रतलामच्या सैलाना विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 85.49 टक्के मतदान झाले. गेल्या वेळी मध्य प्रदेशात एकूण 75 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, दोन्ही राज्यांमध्ये मतदानादरम्यान काही हिंसक घटना घडल्याचे वृत्त आहे. छत्तीसगडमध्ये मतदानाबाबत लोकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला, येथे मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लावल्या होत्या.

Assembly elections
Maratha Reservation: "मला माझ्याच वक्तव्याचा आता पश्चाताप होतोय!"; संभाजीराजे भुजबळांबाबत असं का म्हणाले ?

छत्तीसगडमध्ये एका ठिकाणी नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही. बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. या ठिकाणी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 90 जागांपैकी 20 जागांवर मतदान झाले असून, उर्वरित 70 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या टप्प्यात एकूण 958 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. त्यामध्ये 827 पुरुष, 130 महिला आणि एक तृतीयपंथीय उमेदवाराचा समावेश आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com