Chhagan Bhujbal : बीडमध्ये 'त्या' दिवशी नेमकं काय आणि कसं घडलं?, भुजबळांनी सांगितला घटनाक्रम, म्हणाले...

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : ७० पोलिस काय पाय घसरून पडले का, त्यांना कोणी मारलं? असा थेट सवालही जरांगेंना उद्देशून केला आहे.
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange
Chhagan Bhujbal Vs Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज दोघेही आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. एकीकडे मनोज जरांगे हे सभा घेत आहेत, तर दुसरीकडे ओबीसींच्या बाजूने छगन भुजबळ हेदेखील भूमिका जाहीर करत आहेत. याशिवाय मनोज जरांगेंकडून होत असलेल्या आरोप आणि विधानांनाही भुजबळांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.

दरम्यान, आज मनोज जरांगेंच्या जालना जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळांची सभा पार पडली. या वेळी अनेक ओबीसी नेत्यांची भाषणं झाली, तर छगन भुजबळांनी थेट मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange
Manoj Jarange Patil : ''सध्या बिनकामाची कळपं एकत्र येतायत''; जरांगे पाटलांचा ओबीसी नेत्यांवर निशाणा!

मनोज जरांगे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं आहे, नेमकं काय घडलं. पोलिसांचा लाठीमार सगळ्यांनी पाहिला. पण महिला पोलिसांसह ७० पोलिस रुग्णालयात दाखल झाले. दगडाचा मार खाऊन जखमी झाले. ७० पोलिस काय पाय घसरून पडले का? त्यांना कोणी मारलं.

एवढंच नाही, या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर, नीलम गोऱ्हे किंवा आणखी कोणी महिला असतील, त्यांनी महिला पोलिसांच्या घरी जावे, तुम्हाला आम्ही पत्ते देतो. त्यांच्यावर काय बितली हे त्यांच्याकडून जाणून घ्या. त्या काय झालं हे तुम्हाला सांगतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुनेलासुद्धा आई म्हणून परत पाठवलं आणि तुम्ही आमच्या महिला पोलिसांवर....लाज नाही का वाटली तुम्हाला. हे सगळं झाल्यानंतर मग पोलिसांनी लाठीचार्ज केला.

या प्रकरणी पोलिसांची बाजू समोर आलीच नाही. एकच बाजू आली की पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण पोलिसांवर जर हल्ला झाला तर त्यांनी काय करायला पाहिजे? हा लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार(मनोज जरांगे) घरात जाऊन झोपले. यांना आमदार राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार हे घरातून घेऊन आले आणि म्हणाले बस तिकडे, शरद पवार येणार आहेत. मग शरद पवारांना त्यानी आणलं. पण त्यांनी शरद पवारांना हे नाही सांगितलं, की हा लाठीचार्ज का झाला? शरद पवारांना आजही आम्ही एक उत्कृष्ट प्रशासक समजतो. त्यांना जर हे दाखवलं असतं, की हे प्रकार इथे झाले तर आज वेगळा मुद्दा निर्माण झाला असता. आज मराठा तरुणांची जी सहानुभूती गेली आहे, ती गेली नसती.

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange
Maratha Reservation : आणखी एक आत्महत्या; सरमकुंडीत विनोद गायकवाड यांनी संपवले जीवन!

...आणि पोलिसही विचार करायला लागले -

यामध्ये चूक अनेकांची आहे. पोलिस अधीक्षकांचीसुद्धा चूक आहे. त्यांनी सांगायला पाहिजे होतं, माझे एवढे पोलिस रस्त्यावर जखमी होऊन पडले असताना, त्यांच्यावर हात टाकला असताना मी काय करू शकतो. परंतु त्या पोलिसांचं तोंड बंद. मी फडणवीसांना विचारलं, तुम्ही गृहमंत्री आहात, तुमच्याकडे सगळी माहिती आहे. तुम्ही सांगायला पाहिजे होतं. माझ्या पोलिसांवर तिथे मारहाण झाली. मी हे सहन करू शकत नाही. मात्र, राज्याच्या पुढे, देशाच्या पुढे हे खऱं चित्र आलं नाही. उलट पोलिसांना निलंबित केलं गेलं, गृहमंत्रीच माफी मागायला, गुन्हे मागे घेतो. किती लांगुलचालन करायचं याचं? त्यांची हिंमत वाढली आणि पोलिसही विचार करायला लागले. आम्ही काही करायला गेलो तर आमच्यावरही हल्ले, उत्तर द्यायला गेलो तर निलंबित, गुन्हे मागे. जाऊ द्या बीडमध्ये काय व्हायचं ते होऊ द्या. काय करतायत ते करू द्या.

बीडमध्ये नेमकं काय घडलं? -

छगन भुजबळांनी सांगितलं, ''आमदार प्रकाश सोळुंकेंच्या घरी हे(आंदोलक) घुसले. दोन दरवाजे होते, पहिला दरवाज तोडला सगळं कार्यालय आणि वाहनं जाळली. सगळीकडे पेट्रोल बॉम्ब, कोयते, चॉपर, पहारी अशा सगळ्या गोष्टी तयार होत्या. दोनशे-चारशे असे लोक गेले होते. दुसरा दरवाजा तोडूनही हल्ला झाला, मी स्वत: टीव्हीवर बघत होतो. एकच गट नव्हता अनेक गट होते. कोड नंबर दिले गेले होते.''

''सुभाष राऊतचं हॉटेल बीड शहरापासून दहा-पंधरा किलोमीटर लांब होतं, तो काय आमदार नाही. केवळ ओबीसीचा एक कार्यकर्ता आहे. तो माझ्यासमोर मंत्रालयात माझ्या कार्यालयात बसलेला होता, तेव्हा सोळुंकेचं घर पेटवलेलं आम्ही पाहिलं. यानंतर मी स्वत: पोलिस अधीक्षकांना फोन केला. प्रकाश सोळुंकेंच्या घरावर हल्ला झाल्यानंतर, दुसरा नंबर हा सुभाष राऊतचा राहणार आहे, त्यामुळे तुम्ही संरक्षण द्या असं सांगितलं. सुभाष राऊत यांना जाण्यास सांगितलं आणि चार वाजता बघतो तर सुभाष राऊतचं हॉटेल पेटलेलं आहे. फरशासुद्धा उखडल्या, राखरांगोळी म्हणजे काय असतं हे तेव्हा मला समजलं.''

शिवाजी महाराजांनी स्वकीयांची घरं जाळायला तुम्हाला सांगितलं का? -

याशिवाय ''आमदार संदीप क्षीरसागर यांचं दोन-तीन मजली कार्यलाय भुईसपाट. त्याच्याच शेजारी जयदत्त क्षीरसागर, शिक्षण संस्थेच्या कार्यालयाचीही राखरांगोळी. त्यानंतर राऊतच्या घरी गेले आणि त्याला बाहेर काढा आमच्या हवाली करा असं म्हणू लागले. अखेर त्यांच्या घरातील महिला बाहेर आल्या त्यांनी आरडाओरड केली तेव्हा आजबाजूच्या महिला एकत्र येऊन समोर उभा राहिल्या, तेव्हा ते वाचले. तिथून निघून जयदत्त क्षीरसागरच्या घरावर गेले. संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर तिथेच राहतात, सगळ्यांच्या महिला आणि मुलंबाळं तिथेच राहतात.''

''पेट्रोल बॉम्ब फेकले गेले, वाहनं पेटवली. धुराचे लोट बाहेर येऊ लागले, धूर घरात शिरला तेव्हा त्यांचीही मुलंबाळं घरात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीयांची घरं जाळायला तुम्हाला सांगितलं का? स्वत:च्या माता-भगिनी पेटवायला तुम्हाला सांगितलं का? काय याची चौकशी होणार, कधी होणार? हे दु:ख आमच्या मनात आहे,'' असंही या वेळी छगन भुजबळांनी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com