MP Election Opinion Poll : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांनी प्रचारासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. सत्ताधारी भाजप असो की काँग्रेस हे पक्ष निवडणुकीत विजयाचा दावा करत आहेत. या निवडणुकीपूर्वी वेगवेगळे न्यूज चॅनेल्स आणि संस्थांचे ओपिनियन पोल येत आहेत. अशातच इंडिया टीव्हीचा ओपिनियन पोल आला आहे. हा ओपिनियन पोल सर्वांना चकित करणारा आहे.
लोकसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड (Chhattisgarh), तेलंगणा आणि मिझोराममध्ये या निवडणुका होत आहेत. आणि त्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही सेमिफायनल म्हणून याकडे बघितलं जात आहे. यामुळे सर्व राजकीय पक्षांसाठी या विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पण या निवडणुकीत सर्व पक्षांचा अधिक भर हा मध्य प्रदेश आणि राजस्थानवर (Rajasthan) आहे. कारण या ठिकाणी लोकसभेच्या अधिक जागा आहेत. या पार्श्वभूमीवर विविध संस्थांचे ओपिनियन पोल समोर येत आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत आणखी एक ओपिनियन पोल समोर आला आहे.
इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलनुसार मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) काट्याची टक्कर होण्याचा अंदाज आहे. निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या (BJP) तुलनेत काँग्रेस चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. ओपिनियन पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला १०२ ते ११० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला ११८ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे.
टाइम्स नाउच्या ओपिनियन पोलनुसार मध्य प्रदेशच्या २३० जागांच्या विधानसभेत काँग्रेस ११८ ते १२८ जागा मिळवेल, असा अंदाज आहे. तर भाजपला १०२ ते ११० जागा जिंकता येतील, अशी शक्यता आहे. निवडणुकीत दोन्ही पक्षांना जवळपास ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
गेल्या निवडणुकीत काय झालं होतं ?
मध्य प्रदेशात २०१८ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०९ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने ११४ जागांवर विजय मिळवला होता. पण काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ज्योतिरादित्य शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये गेले आणि काँग्रेसचे पक्षाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. आणि भाजपचे शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.