Supriya Sule, BJP
Supriya Sule, BJPSarkarnama

Supriya Sule News : सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर शिंदे अन् फडणवीस; म्हणाल्या, " दिल्लीतील अदृश्य शक्तीनं..."

NCP Political News : "...हा चुकीचा पायंडा भाजपने पाडला आहे!''
Published on

Nagpur Politics : एका अदृश्य शक्तीने एका व्यक्तीला महाराष्ट्रात मुख्यमंत्री केलंय, तर त्याच शक्तीने एकाला हाफ उपमुख्यमंत्री केलंय, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. त्या रविवारपासून विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. सुळे यांनी या दौऱ्यात भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटावरही निशाणा साधला आहे.

खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी नागपुरात रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. सुळे म्हणाल्या, दिल्लीतील अदृश्य हात घरं तोडतो, पक्ष फोडतो. पण कोणताही नेता कोणत्याही संघटनेत गेला तरी कार्यकर्ते मात्र पवारसाहेबांवर प्रेम करणारे आहेत. गेल्या सहा दशकांपासून पवार घराण्याचे नागपूरशी नातं आहे. त्यामुळे नागपुरातील पवारसाहेबांचे सच्चे कार्यकर्ते त्यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचा दावा खासदार सुळे यांनी केला.

Supriya Sule, BJP
Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा दौरा, मोठ्या लढ्याची नांदी ठरणार..

सुळे म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत गोंदिया, भंडाऱ्यात राष्ट्रवादीची ताकद अपेक्षा होती, त्याप्रमाणे वाढली नाही असे नमूद करीत त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या प्रफुल्ल पटेल यांना टोला लगावला. पटेल यांची शरद पवारांसोबत(Sharad Pawar) घूटमळ होत होती, अशी कोणतीही परिस्थिती पक्षात नव्हती. उलट त्यांना पक्षात मानाचे स्थान होते. त्यांची घूटमळ नेमकी कशामुळे होत होती, हे त्यांनीच स्पष्ट केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या.

सुळेंचा भाजपवर गंभीर आरोप...

सद्य:स्थितीत ९५ टक्के खटले विरोधी पक्षातील नेत्यांवर आहेत. सत्तापक्षात ते सहभागी झाले की, त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात येतात. हा चुकीचा पायंडा भाजप(BJP)ने पाडला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न जसे महागाई, बेरोजगारी आदी मागे पडत चालले आहेत. भाजप केवळ सत्तेसाठी घरं आणि पक्ष फोडण्याचं काम करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

मुळात आपली लढाई भाजपसोबत नाहीच. आपण जी लढाई लढत आहोत, ती वैचारिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांना या वैचारिक लढ्यात सहभागी व्हायचं आहे, ते ‘इंडिया’ आघाडीसोबत येत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे मातीशी नाळ जुळलेले दोन पक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. शरद पवारांनीही संघर्ष केला. परंतु सध्याच्या दिल्लीकरांनी दोन्हीही पक्षाला मोठे नुकसान पोहोचविले आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठे आरोप करत आहे. त्यांच्याजवळ त्याचे पुरावे असतील, तर त्यांनी ते जाहीरपणे सादर करावे. पुरावे नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची जाहीर माफी मागावी, असं आव्हानही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Supriya Sule, BJP
Shivajirao Moghe News : माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरोधात माना समाज आक्रमक; वरोऱ्यात भरपावसात काढला मोर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com