Mumbai: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २६ आरोपींविरुद्ध मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सिद्दीकी यांची हत्या कशामुळे झाली, यांची कारणे यात नमुद केली आहे. ४,५९० पानाचे हे आरोपपत्र असून यात १८० जणांची जबाब नोंदविण्यात आले आहेत.
आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही भक्कम पुरावे न्यायालयात सादर केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. गुन्हेगारी जगात वर्चस्व स्थापन करण्यासाठी बिश्नोई टोळीचा मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई याने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे आरोपपत्रात म्हटलं आहे. अभिनेता सलमान खानची हत्या हे बिष्णोई गँगचे टार्गेट होते, पण हा प्रयत्न फसला, त्यानंतर सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, असे आरोपपत्रात नमूद केले आहे.
सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांची साक्ष पोलिसांनी नोंदवली आहे. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर, सहा मॅगझीन, पाच देशी बनावटीचे पिस्तूल, ८४ जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे.अनमोल बिष्णोईच्या इशाऱ्यावरून बाबा सिद्धीकी यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे.
सिद्दीकी यांची अभिनेता सलमान खानसोबतची जवळीक
कोठडीत आत्महत्या केलेल्या अनुज थापनचा बदला घेणे
बिष्णोई गँगची दहशत प्रस्थापित करण्यासाठी सिद्दीकींची हत्या.
पोलिसांनी यासाठी आरोपी शुभम लोणकरच्या फेसबुक पोस्टचा दाखला दिला
शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम (मुख्य शूटर)
गुरमेल बलजीत सिंग (मुख्य शूटर)
धर्मराज राधे कश्यप (मुख्य शूटर)
चेतन दिलीप पारधी
संभाजी किसन पारधी
राम फुलचंद कनोजिया
भगवतसिंग ओमसिंग
प्रवीण रामेश्वर लोणकर
हरिशकुमार बालकराम निशाद
नितीन गौतम सप्रे
प्रदीप दत्तू ठोंबरे
शिवम अरविंद कोहाड
सुजीत सुशील सिंग
गौरव विलास आपुणे
आदित्य राजू गुळणकर
अमीत हिसमसिंग कुमार
रुपेश राजेंद्र मोहोळ
करण राहुल साळवे
रफिक नियाज शेख
अनुराग राधेश्याम कश्यप
ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी
आकाश बृजकुमार श्रीवास्तव
अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह
आकाशदिप कारजसिंग गिल
सलमानभाई इक्बालभाई बोहरा
सुमीत दिनकर वाघ
मोहम्मद यासिन अख्तर ऊर्फ मोहम्मद जमील ऊर्फ जिशान अख्तर ऊर्फ मोहम्मद जसीन ऊर्फ अख्तर ऊर्फ जुल्मी
शुभम रामेश्वर लोणकर ऊर्फ शुब्बू
अनमोल लविंदरसिंग बिश्नोई ऊर्फ भानू ऊर्फ भाईजी ऊर्फ एबी भाई
वांद्रे येथे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारानंतर पळून जाणार्या गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.