MP Sanjay Raut slams NCP leader Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. 'या सर्व अफवा आहेत,' असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
अजितदादांनी या चर्चांवर मंगळवारी सायंकाळी प्रतिक्रिया दिली. पाच ते सहा तास सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण देताना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
आज (बुधवारी) अजितदादांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राऊतांनी दिलेल्या उत्तरावरुन आघाडीतील या दोन बड्या नेत्यांमध्ये खटके उडण्यास सुरवात झाली असल्याचे दिसते
काल अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देताना संजय राऊतांवर निशाणा होता. आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे तुम्हाला कोणी वकील पत्र दिले ? आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला ? असे सवाल उपस्थित करत नाव न घेता अजित पवार यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या चर्चा आणि त्यावर संजय राऊतांनीकेलेले भाष्य बघता अजित पवारा संतापले होते. राऊतांचे नाव न घेता आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी वकील पत्र दिले आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यावर राऊत म्हणाले, 'मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी अजित पवारांचे का ऐकून घेऊ, माझ्यासाठी शरद पवारांची भूमिका महत्वाची आहे. मी फक्त शरद पवार यांचेच ऐकतो,"
"शिवसेना फुटली तेव्हा मी आमचीच वकील केली," अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांना सुनावलं.
कोणाला टोचत असेल तर मी काय करू?
'सामना'च्या रोखठोक सदरात मी चुकीचे काहीही बोललेलो नाही. स्वत: शरद पवार हेच विरोधी पक्षातील आमदारांवर दबाव टाकला जात असल्याचे म्हणत आहेत. त्यांनी स्वत: ईडीच्या गैरवापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. तेच मी सामनामध्ये लिहिले तर चुकीचे काय? मी यापुढेही लिहित राहणार, बोलत राहणार, कोणाला टोचत असेल तर मी काय करू?
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.