ED Action On Sanjay Singh : 'मरना मंजूर है, झुकना मंजूर नहीं...'; ईडीकडून अटक झाल्यानंतर संजय सिंहांची प्रतिक्रिया

Delhi Liquor Scam: इडीने अटक करण्यापूर्वी खासदार संजय सिंहांनी आईच्या चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला
Sanjay Singh
Sanjay Singh Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने बुधवारी अटक केली. संजय सिंह यांच्या निवासस्थानावर आज सकाळीच छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर संजय सिंहांची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली.

त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. या अटकेनंतर खासदार संजय सिंह यांनी त्यांच्या एक्स हँडलवर (ट्विटर) एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यात "मरना मंजूर है, झुकना मंजूर नहीं है", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Sanjay Singh
ED Action On Sanjay Singh : मोठी बातमी ! दिल्लीतील मद्य घोटाळ्यात खासदार संजय सिंहांना ईडीकडून अटक

खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केल्यानंतर आता या विरोधात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. तसेच देशभरातही आंदोलन करण्याचा इशारा 'आप'कडून देण्यात आला आहे.

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी गेल्या एक वर्षापासून तपास यत्रणांकडून छापेमारी सुरू आहे. याच प्रकरणामध्येच 'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांना फेब्रुवारीमध्ये अटक झाली होती. ते अद्याप तुरुंगातच आहेत, तर आता संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

दरम्यान, संजय सिंह यांना अटक होण्याच्या आधीचा एक व्हिडिओ आम आदमी पक्षाने एक्स हँडलवर (ट्विटर) शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये संजय सिंह हे त्यांच्या आईच्या चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेताना दिसत आहेत, तर प्रत्येक क्रांतिकारकाला तुरुंगवास भोगावा लागतो, आज संजय सिंह यांनाही हे सौभाग्य लाभले. ना ते घाबरते, ना घाबरणार, ते लढत राहतील, असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

संजय सिंह यांनी एक्स हँडलवर काय म्हटलं ?

खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आम आदमी पक्षाने एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये संजय सिंह हे प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. "मी अदानींचे अनेक घोटाळे उघड केले, ईडीकडेदेखील तक्रार केली.

पण अदानींवर कोणतीही कारवाई झाली नाही. मोदीजी 2024 च्या निवडणुकीत वाईटरित्या हरत आहेत. लोकांना तुरुंगात टाकून ते जिंकू शकत नाहीत. अदानींच्या घोटाळ्यांविरोधात मी यापूर्वीही बोललो होतो आणि यापुढेही बोलत राहणार आहे", असं संजय सिंह यांनी म्हटलं.

Edited by Ganesh Thombare

Sanjay Singh
Kalyan Dombivli MNS News : फेरीवाल्यांना मारहाण करणं मनसैनिकांना भोवलं; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com