Kalyan Dombivli MNS News : फेरीवाल्यांना मारहाण करणं मनसैनिकांना भोवलं; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल

MLA Raju Patil News : आमदार राजू पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत पोलिसांना जाब विचारला
Kalyan MNS News
Kalyan MNS NewsSarkarnama
Published on
Updated on

Dombivali News : कल्याणमध्ये एका विद्यार्थ्याशी परप्रांतीय फेरीवाल्यांनी वस्तू खरेदीवरून उर्मट वर्तन केल्याची घटना घडली होती. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या फेरीवाल्यांना धडा शिकवत त्यांना चोप दिला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, आता फेरीवाल्यांना मारहाण करणं मनसैनिकांना चांगलंच भोवलं असून, सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातदेखील महात्मा फुले पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

Kalyan MNS News
Chandrapur District News : सरपंच म्हणाल्या, यायचेच नव्हते, तर मग कशाला मारल्या सह्या !

फेरीवाल्यांना मारहाण करणं मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. आमदार राजू पाटील आणि पदाधिकारी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत पोलिसांना जाब विचारला आहे.

तसेच तक्रार करण्यासाठी फेरीवाल्यांवर (फिर्यादी) पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप मनसेने केला आहे. या वेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Kalyan MNS News
Kalyan Dombivli MNS News: फेरीवाल्यांना मनसेचा दणका; विद्यार्थ्याशी उर्मट वर्तन करणाऱ्याला दिला चोप

नेमकं काय घडलं होतं ?

वाशिंदमधील एक विद्यार्थी कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. या वेळी त्याने'स्कायवॉक'वर एका फेरीवाल्याकडून वस्तू खरेदी केली. पण वस्तू खराब वाटल्याने ती वस्तू विद्यार्थ्याने फेरीवाल्यास परत केली. मात्र, त्या वस्तूचे पैसे परत देण्यास फेरीवाल्याने नकार दिला. याचवेळी फेरीवाल्याने मराठी भाषेचा आपमान करत विद्यार्थ्याशी हुज्जत घातली.

तसेच तेथील तीन-चार जणांनी त्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करत मारहाण केली होती. या घडलेल्या प्रकाराची तक्रार त्या विद्यार्थ्याने कल्याण पूर्वेमधील मनसे शाखेत केली. यानंतर मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी 'स्कायवॉक'वर जात तेथील परप्रांतीय फेरीवाल्यांना चोप दिला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आता मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Kalyan MNS News
Satara BJP News : सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत बावनकुळेंचे महत्त्वपूर्ण विधान; भाजप की, घटक पक्ष...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com