…तर काही वृत्तवाहिन्या तिसरं महायुध्द पेटवतील! थरूरांनी निवेदकांनाही पाडलं उघडं

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रमात चर्चा करण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
Shahi Tharoor
Shahi Tharoor Sarkarnama

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रमात चर्चा करण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यावर काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी भारतीय वृत्तवाहिन्या व वृत्तनिवेदकांचीच फिरकी घेतली आहे.

भारत (India) आणि पाकिस्तानमधील मतभेद मिटवण्यासाठी मोदींनी टीव्हीवर आपल्यासोबत चर्चा करावी, असं खान यांनी रशियातील (Russia) सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. खान यांच्या या आवाहनला शशी थरूर यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. यामध्ये त्यांनी भारतीय वृत्तवाहिन्यांनाच उघडं पाडलं आहे.

Shahi Tharoor
गोडसे समर्थक महिलेने निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ होऊ दिला नाही!

थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, प्रिय इम्रान खान, युध्दापेक्षा चर्चेतून मार्ग निघाल्यास चांगलेच आहे. पण भारतीय वाहिन्यांवरील चर्चेतून कोणताच मुद्दा सुटलेला नाही. उलट तो अधिकच भडकला आहे. आणि काही आमच्या काही वृत्तनिवेदकांना तर टीआरपी वाढणार असल्यास तिसरं महायुध्दही पेटवण्यात आनंद वाटेल, असा टोला शरूर यांनी लगावला आहे.

इम्रान खान काय म्हणाले?

मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना खान म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद चर्चेतून सोडवले जाऊ शकतात. ही दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी चांगली गोष्ट असेल. माझा पक्ष तहरीक ए इंसाफ २०१८ मध्ये सत्तेत आला त्यावेळी भारताशी तात्काळ संपर्क केला होता. काश्मीर प्रश्न भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून मिटवण्याबाबत चर्चा केली होती. पण त्यावर भारताकडून सकारात्मक उत्तर मिळालं नाही, असं खान यांनी स्पष्ट केलं.

मी नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीव्हीवर चर्चा करण्यास तयार असल्याचेही खान यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्प्ट केलं. भारतात दहशतवादी संघटनांकडून २०१६ मध्ये पठाणकोट हवाई दलाच्या ठिकाणावर हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध आणखीनच बिघडले आहेत. उरी येथील भारतील लष्कराच्या शिबीरावर झालेल्या हल्ल्यानंतर तर पाकिस्तानबाबत केंद्र सरकारने अधिक कडक पावले उचलण्यास सुरूवात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com