Amit Shah to Meet Both CMs : तारीख ठरली ; अमित शाह घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट

Maharashtra-Karnataka Border Dispute News update : अमित शाह यांनी घेतली दखल
Amit Shah on karnataka Maharashtra Border Dispute News update
Amit Shah on karnataka Maharashtra Border Dispute News updatesarkarnama
Published on
Updated on

Border Dispute : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार आहेत. (Amit Shah on Karnataka Maharashtra Border Dispute News update)

सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भेटीबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे माध्यमांना माहिती दिली.

Amit Shah on karnataka Maharashtra Border Dispute News update
Shraddha Walkar's Father Said:..तर आज श्रद्धा जिवंत असती..; श्रद्धाच्या वडीलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याची दखल शाह यांनी घेतली आहे,"

"महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या वाचाळवीरांची माहिती आम्ही अमित शाह यांना दिली आहे," असे सुळे म्हणाल्या. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सर्व पक्ष बैठक बोलवावी," असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

"शांततेच्या मार्गाने सीमा प्रश्ना बाबतची कृती केली पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे हा आमचा आग्रह आहे, या प्रश्नावरुन हिंसा होऊ नये," असे सुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले, " सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवल बोलणे झाले आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर बोलून समन्वयाने या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली. अमित शहा यांनी संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतला,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com