Siddaramaiah News : भाजप तोंडघशी; सिध्दरामय्या यांना सर्वात मोठा दिलासा

Karnataka CM News MUDA Case Lokayukta Police : कथित जमीन घोटाळ्यामध्ये सिध्दरामय्या यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून करण्यात आले होते.
Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Karnataka CM News : कर्नाटकातून मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारी भाजप तोंडघशी पडली आहे. भाजपने आरोप केलेल्या कथित जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांविरोधात लोकायुक्त पोलिसांना एकही पुरावा सापडला नाही. त्यामुळे सिध्दरामय्यांसह त्यांच्या पत्नी व इतरांना याप्रकरणी क्लिन चीट मिळाल्याचे वृत्त आहे.

म्हैसूर नागरी विकास प्राधिकरणामध्ये MUDA जमीन घोटाळा झाल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना पत्नीच्या नावे पर्यायी जमीन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी राज्यपालांकडूनही लोकायुक्त पोलिसांना चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.

Siddaramaiah
Haryana Congress: हरियाणा काँग्रेसला मोठा झटका; अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपने राज्यात रान उठवले होते. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी भाजपकडून करण्यात आली होती. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलन करण्यात आले. दिल्लीपर्यंत हा मुद्दा गाजला होता. त्यामुळे सिध्दरामय्या यांचे पद जाणार, अशी जोरदार चर्चा त्यावेळी रंगली होती. पण पक्षश्रेष्ठी त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. 

सिध्दरामय्या यांनी यापूर्वीच सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्यांच्या पत्नीनेही प्राधिकरणाला सर्व जमीन परत केली होती. भाजपने याप्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. कर्नाटक हायकोर्टाने याबाबतची याचिका नुकतीच फेटाळून लावली आहे. त्यातच आता लोकायुक्तांकडूनही सिध्दरामय्या यांना क्लिन चीट मिळाल्याने त्यांच्यासह काँग्रेस सरकारलाही मोठा दिलासा मिळाला आहे.

Siddaramaiah
Delhi CM oath ceremony : दिल्लीतील शपथविधी सोहळाही भाजप गाजवणार; मोदींसह बॉलीवूड स्टार्स, उद्योगपतींची मांदियाळी

सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्णा यांनी प्राधिकरणाकडून जमीन देतानाच्या प्रक्रियेत अनियमितता असल्याचे आरोप केले होते. तशी याचिका लोकायुक्तांकडे केली होती. त्यानंतरच चौकशी सुरू झाली होती. त्यांनी केलेले आरोप सिध्द करण्यासाठी एकही पुरावा नसल्याचे लोकायुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कृष्णा यांना नोटीस पाठवून त्यांना त्यावर म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर लोकायुक्तांकडून अंतिम अहवाल सादर केला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com