Siddaramaiah : सिध्दरामय्या यांच्याभोवतीचा फास आवळला; कोर्टाच्या आदेशाने धाबे दणाणले

MUDA Scam Karnataka Government : हायकोर्टाने मंगळवारीच सिध्दरामय्या यांची राज्यपालांविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.
Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Congress CM News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या भोवतीचा फास आता आवळत चालला आहे. कर्नाटक हायकोर्टाने मंगळवारी त्यांची राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळत पहिला धक्का दिला होता. त्यानंतल लागोपाठ दुसऱ्या विशेष कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणाच्या (MUDA) कथित जमीन घोटाळ्यात सिध्दरामय्या यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी विशेष न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपाला थावरचंद गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वीच मंजूरी दिली आहे. त्याविरोधात मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टात व घेतली होती.

Siddaramaiah
Arvind Kejriwal : हरियाणात मतदानाआधीच केजरीवालांनी गाशा गुंडाळला; जाहीर सभेत केलं मान्य...

कर्नाटकमधील विशेष न्यायालयाने MUDA भूखंड प्रकरणी सिध्दरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिले. लोकायुक्त पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जाणार आहे. न्यायाधीश संतोष भट्ट यांनी हा आदेश दिला आहे.

सिध्दरामय्या यांच्या पत्नीला बेकायदेशीरपणे 14 भूखंड देण्यात आल्याचा आरोप आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी याबाबत याचिका केली आहे. आता हायकोर्टासह विशेष कोर्टानेही खटला चालवण्याचे आदेश दिल्याने सिध्दरामय्या यांच्या अडचणी वाढणार आहे. मागील काही महिन्यांत गुन्हा दाखल होणारे सिध्दरामय्या तिसरे मुख्यमंत्री ठरतील.

Siddaramaiah
Rahul Gandhi Video : मोदीजी, तुम्ही पुन्हा बदमाशी करत आहात? राहुल गांधींचा पारा चढला...काय घडलं?

कोर्टाच्या आदेशानंतर भाजपकडून सिध्दरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांनी आधी राजीनामा द्यावा, मग चौकशीला सामोरे जावे, असे भाजपने म्हटले आहे. मात्र, सिध्दरामय्या यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तत्कालीन भाजप सरकारने सुरू केलेल्या योजनेअंतर्गतच भूखंड मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सिध्दरामय्या यांना काँग्रेस हायकमांडसह राज्यातील आमदारांचाही पाठिंबा असल्याने ते राजीनामा देणार नाही, असे नेत्यांकडून स्पष्ट केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे कर्नाटकातील राजकारण सध्या मुख्यमंत्र्यांभोवती फिरत आहे. भाजपकडून दररोज आंदोलन केले जात असून सीबीआय चौकशीचीही मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com