
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अखेर आज आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे. मागच्या दोन दिवसांपासून आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. त्यामुळे अखेर ज्येष्ठ वकील आणि माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या प्रयत्नांना यश आला आहे. सतीश मानेशिंदे यांनी जामीनासाठीचा अर्ज सादर केला होता. मानेशिंदे यांनी संजय दत्त आणि सलमान खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांची प्रकरणे हाताळली आहेत. मात्र, आर्यन खानला जामीन न मिळाल्याने अमित देसाई या दिग्गज वकिलांनी आर्यनच्या कायदेशीर टीममध्ये एन्ट्री घेतली होती. पण त्यानंतरही आर्यनला जामीन मिळू शकला नव्हता.
त्यामुळे या टीमला कायदेशीर सहकार्य करण्यासाठी मुकुल रोहतगी आणि त्यांची टीम लंडनहून मुंबईत दाखल झाली होती.
आर्यन खान प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत अमित देसाई आणि मुकुल रोहतगी हे सर्व कायदेतज्ञ न्यायालयात हजर होते. मात्र आज जामीन मिळवून देण्यासाठी मुकुल रोहतगी यांचा युक्तीवाद अत्यंत महत्वाचा ठरला. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज किंवा त्याने ड्रग्ज घेतल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकारांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीही केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता.
कोण आहेत मुकुल रोहतगी?
देशातल्या दिग्गज कायदेतज्ज्ञांत मुकुल रोहतगी यांचे नाव घेतले जाते. त्यांचे पिता अवध बिहारी रोहतगी हे पुर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या रोहतगी यांनी योगेश कुमार सभरवाल यांचे ज्युनिअर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. १९९३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांना सीनिअर कौन्सिलचा दर्जा मिळाला.
त्यानंतर १९९९ साली केंद्रात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना अॅडिशनल सॉलिसिटर जनरल पदाची जबाबदारी देण्यात आली. २००२ साली गुजरात दंगलीनंतर रोहतगी यांनीच सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारची बाजू मांडली होती. पुढे २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुकुल रोहतगींकडे अॅटर्नी जनरल पदाची जबाबदारी सोपवली. १८ जून २०१७ पर्यंत रोहतगी या पदावर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.