Delhi-Mumbai Express way : मुंबई-दिल्लीचे अंतर लवकरच १२ तासांचं; मोदी करणार 'या' टप्प्याचं उदघाटन

Narendra Modi : एक हजार ३९० किलोमीटरचं अंतर असून देशातील सर्वात लांब महामार्ग
Delhi-Mumbai Express way
Delhi-Mumbai Express waySarkarnama
Published on
Updated on

Dehi-Mumbai Express way news : दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचं यापूर्वी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसेच त्यांनी या महामार्गाचे फोटो ट्विट करून देशभरातील नागरिकांना आश्चर्याचा सुखद धक्काही दिलेला आहे. आता शनिवारी (ता. ४ फेब्रुवारी) या महामार्गाच्या एका टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.

Delhi-Mumbai Express way
Shivsena News : शिंदे गटाकडून `बाप जैसा बेटा, भरलो जल्दी लोटा`, म्हणत खैरे पिता-पुत्रावर टीका..

दिल्ली-मुंबई (Delhi-Mumbai Express way) दरम्यान बनवण्यात येत असलेल्या महामार्गाचं अंतर एक हजार ३९० किलोमीटर लांब आहे. या मार्गामुळे दिल्ली-मुंबई दरम्यानचा प्रवास २४ ऐवजी आता केवळ १२ तासांत पूर्ण होणार आहे. हा द्रुतगती मार्ग पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Delhi-Mumbai Express way
Shrigonda News : श्रीगोंदे ‘खरेदी-विक्री’ची निवडणूक बिनविरोध होणार?; पाचपुते, जगताप, नागवडेंना प्रत्येकी तीन जागा...

दरम्यान या महामार्गाच्या दिल्ली-मुंबई महामार्गाच्या सोहना-दौसा (Sohana-Dausa) या टप्प्याचं शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर देशाची राजधानी दिल्ली आणि राजस्थानची राजधानी जयपूर दरम्यानचा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण करता येणार आहे.

असा आहे महामार्ग

या महामार्गामुळं देशाची राजधानी दिल्ली (Delhi) ते आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) जोडली जाणार आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा एकूण आठ लेनचा असून त्याचं अंतर १ हजार ३९० किलोमीटर आहे. या महामार्गामुळं दिल्ली ते मुंबई अंतर १३० किलोमीटरनं कमी होईल. या महामार्गासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. हा आठ लेनचा एक्स्प्रेस वे असून तो १२ लेनपर्यंत वाढवता येतो. या महामार्गाचे काम दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहचणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com