Sharad Pawar News : सर्व विरोधी पक्ष बिहारमध्ये एकत्र येणार; शरद पवारांनी वाढवलं भाजपचं टेंशन!

Sharad Pawar News : नव्या नियुक्तींची घोषणा...
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आज १० जून रोजी साजरा होत आहे. पक्षाने २४ वर्षपूर्ण करून आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने आज दिल्लीमध्ये अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar News) उपस्थित उत्साहात पार पडली. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar
BJP News : 'भाजप माझा पक्ष थोडीच आहे..' असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे आज अमित शाह यांच्याकडे काय म्हणणं मांडणार ?

यावेळी शरद पवार म्हणाले, "आज एक ऐतिहासिक दिवस आहे. शेतकरी, दलित, महिला, आदिवासी, अल्पंसंख्यांची रक्षणासाठी आपला पक्ष उभा राहिला. काम करता करता २४ वर्षे पुर्ण झाले आणि आज २५ व्या वर्षात पदार्पण केले. पक्षाच्या आजच्या स्थितीसाठी हजारो जणांनी परिश्रम घेतले. या सर्वांना मला धन्यवाद द्यायचे आहेत. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे पक्ष आज इथे पोहचला आहे."

Sharad Pawar
Sarkarnama Podcast : बंदुकीतून दहशत पसरवणारे हात जलसंधारणाच्या कामात गुंतली अन् गावाचं रूपडं बदललं!

"या २४ वर्षात वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना पक्षानमे केला. काही राज्यामध्ये आम्ही सत्तेत होतो. केंद्रात मी स्वत: आणि प्रफुल्ल पटेल मंत्री होतो. केरळ राज्यात सत्तेत येत काम करण्याची संधी मिळाली. अनेक राज्यात संधी मिळाली. आता देशात विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. २३ जून रोजी एकत्र येणार आहोत," असे शरद पवार यांनी म्हणाले.

Sharad Pawar
BJP News : 'भाजप माझा पक्ष थोडीच आहे..' असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे आज अमित शाह यांच्याकडे काय म्हणणं मांडणार ?

यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ति केली आहे. कार्यकारी अध्यक्ष हे पद नव्यानेच निर्माण केली गेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com