नवी दिल्ली : नागालँडमध्ये (Nagaland) लष्कराने (Indian Army) केलेल्या गोळीबारात 13 नागरिक ठार झाले आहेत. यावरून या राज्यात वादळ उठलं असून सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे खोटारडे आहेत, अशा घोषणा देत संतप्त नागरिक आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शहांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अमित शहांनी या घटनेबाबत संसदेत दिलेली माहिती खोटी असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या वेळी अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात ओटिंग गावातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. या घटनेत ठार झालेल्या 14 नागरिकांपैकी 12 जण या गावातील आहेत. या नागरिकांचे नेतृत्व कोन्याक युनियन या आदिवासींच्या शिखर संघटनेने केले. शहांनी संसदेत दिलेली माहिती कामकाजातून काढून टाकावी आणि त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागालँडमधील मोना जिल्ह्यात 4 डिसेंबरला रोजी 13 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. लष्कराच्या जवानांनी बेछूट केलेल्या गोळीबारात या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारामध्ये एक जवानही हुतात्मा झाला होता. त्यानंतर नागालँडसह ईशान्येकडील राज्यांमध्ये तणावाची स्थिती आहे. राज्यात सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी लवकरच संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते अमित शहा?
या घटनेविषयी अमित शहा संसदेत म्हणाले होते की, लष्कराकडून 4 डिसेंबरला बंडखोरांविरोधात मोहीम सुरू होती. यादरम्यान, एका पिकअपमध्ये काही नागरिक जात होते. त्यांना थांबण्यास सांगूनही ते थांबले नाहीत. त्यामुळे जवानांनी गोळीबार केला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या नागरिकांची ओळख न पटवताच गोळीबार करण्यात आला. या नागरिकांचे मृतदेह पाहिल्यानंतर गावातील नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली. यातून लष्करी वाहनांवर गावकऱ्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर जवानांनी स्वत:च्या बचावासाठी केलेल्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला. यात एक जवानही हुतात्मा झाला. या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाणार असून, एक महिन्यात त्याचा अहवाल येणार आहे.
नागा आर्मीचा सरकारला इशारा
बंडखोर संघटना असलेल्या गव्हर्नमेंट ऑफ द पिपल्स रिपब्लिक ऑफ नागालँड (GPRN) च्या नागा आर्मीने (Naga Army) निर्वाणीचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. नागा नागरिकांच्या हत्येचा बदला घेणआर असल्याचे सांगत नागा आर्मीने लष्कराविरुध्द आता युध्द पुकारले असल्याचे सांगितले जात आहे. नागा आर्मीने म्हटले आहे की, राज्यात शांततामय वातावरणासाठी आम्ही भारतीय लष्कराविरोधातील कारवाया थांबवल्या आहेत. पण लोकांना लष्कराकडून कायम मिळाले? काहीच नाही. केवळ अत्याचार, बलात्कार, हत्या अशा घटना वेळोवेळी घडल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.