पणजी : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (TMC) राष्ट्रीय पातळीवर विस्तारासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) होत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) तृणमूलने मोठी घोषणा केली आहे. गोव्यात सत्तेत आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 5 हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तृणमूल गोव्यात सर्व 40 जागा लढवणार आहे. गोव्याची धुरा पक्षाच्या आक्रमक खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनीच या गृहलक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. सध्या भाजप सरकारकडून महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. परंतु, त्यासाठी कमाल उत्पन्नाची मर्यादा आहे. तृणमूलची सत्ता आल्यानंतर ही रक्कम 5 हजार रुपये करून उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.
महुआ मोईत्रा म्हणाल्या की, वाढत्या महागाईमुळे महिलांना उत्पन्नाचा आधार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात येईल. या अंतर्गत प्रत्येक घरातील एक महिलेच्या खात्यात दरमहा 5 हजार रूपये जमा केली जातील. पक्षाकडून लवकरच या योजनेच्या कार्डचे वितरण केले जाईल. या कार्डवर विशिष्ट क्रमांक असेल आणि राज्यात तृणमूलची सत्ता आल्यानंतर ती कार्ड सुरू होतील. राज्यातील साडेतीन लाख घरांतील महिलांना याचा लाभ होईल. या योजनेचा खर्च राज्याच्या अर्थसंकल्पाच्या केवळ 6 ते 8 टक्के असेल.
फलेरो हे गोवा काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आले होतं. पण त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाला धक्का बसला होता. पुढील वर्षी गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर तृणमूल काँग्रेसकडून गोव्यातील निवडणूक लढवली जाणार आहे. फलेरो यांच्यासारखा बडा नेता पक्षाच्या गळाला लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.