Narendra Modi : मोदी 3.0 मंत्रिमंडळात 'दक्षिण'चाही मान; कोणत्या राज्याला किती मंत्रिपदं?

South India in Modi Government : कर्नाटकला पाच तर भाजपने नव्याने खाते उघडलेल्या केरळला दोन मंत्रिपदे देण्यात आली आहेत.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Modi 3.0 Government : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत इतिहास रचला. मोदी 3.0 मंत्रिमंडळात त्यांनी दक्षिणेतील राज्यांनाही झुकतं माप दिल्याचे दिसून आले. तब्बल 13 मंत्र्यांना सहभागी करून घेत मोदींनी दक्षिणेतील राज्यात आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या मंत्र्यांचा भाजपला आगामी काळात मोठा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मोदींनी दक्षिण भारतातील 13 खासदारांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले आहे. त्यातील 5 मंत्रि‍पदे एकट्या कर्नाटकच्या पारड्यात पडली आहेत. येथून एचडी कुमारस्वामी यांना नव्याने संधी देण्यात आलेली आहे. तर निर्मला सीतारामन आणि प्रल्हाद जोशी या पूर्वीच्या मंत्र्यांना पुन्हा संधी दिली आहे.

गेल्या मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि राज्यातील माजी मंत्री व्ही. सोमन्ना यांनाही यंदा संधी देण्यात आलेली आहे. दरम्यान, कर्नाटकातील 28 पैकी 19 जागा एनडीएने जिंकल्या आहेत. त्यात भाजपने 17, तर यांच्या जनता दलाने (एस) यांना दोन जागा मिळाल्या आहेत. तर राज्यातील सत्ताधारी काँग्रेसला फक्त नऊ जागांवर समाधान मानावे लागले.

या सरकारमध्ये आंध्र प्रदेशातील तीन मंत्र्यांना स्थान दिले आहे. येथून एनडीएला 21 जागा दिल्या आहेत. शेजारील तेलंगणाच्या वाट्याला दोन मंत्रि‍पदे आलेली आहेत. तेलंगणातून एनडीएने आठ जागा जिंकल्या आहेत. तेलंगणातून जी. किशन रेड्डी आणि बंडी संजय कुमार यांना संधी मिळाली आहे.

Narendra Modi
Modi Oath Ceremony : पंतप्रधान मोदींचं 'Social Engineering' ; मंत्रिमंडळात असा साधला समन्वय!

यावेळी भाजपला सुरेश गोपींच्या विजयाने केरळमध्ये आपले खाते उघडता आले आहे. याची दखल घेत भाजपने केरळला दोन राज्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. यात सुरेश गोपी आणि आणि जॉर्ज कुरीयन यांचा समावेश आहे. तर तमिळनाडूतून एल. मुरुगन यांचीही मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com