Modi Attack on Rahul Gandhi: रायबरेली हा माझ्या मम्मीचा मतदारसंघ; मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

Rae Bareli Constituency 2024:काँग्रेसच्या शहजाद्यांची भाषा पाहता कोणताही उद्योगपती या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ५० वेळा विचार करेल.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra Modisarkarnama

RaeBareli Lok Sabha News: काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांनी आपला मतदारसंघ बदलून रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राहुल यांनी घेतलेल्या या निर्णयाची मोदींनी खिल्ली उडवली आहे.

"हा माझ्या मम्मीचा मतदारसंघ आहे, असे सांगत शहजादाने (राहुल गांधी) यांनी रायबरेली मतदारसंघात धाव घेतली आहे. अगदी आठ वर्षांचा मुलगाही असे करीत नाही," लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला. काँग्रेस सरकारच्या काळात देशातील सुमारे १८ हजार गावांची अवस्था १८ व्या शतकातील गावांप्रमाणे होती, अशी टीका मोदींनी केली. जमशेदपूर (झारखंड) येथे मोदी बोलत होते.

Rahul Gandhi, Narendra Modi
Vivek Kolhe News: विवेक कोल्हेंनी 'नाशिक शिक्षक'साठी ठोकला शड्डू...

"काँग्रेसच्या शहजाद्यांची भाषा पाहता कोणताही उद्योगपती या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ५० वेळा विचार करेल. नक्षलवाद्यांकडून बोलली जाणारी भाषा काँग्रेसचा शहजादा वापरत आहे. नवनवीन पद्धतींद्वारे पैसे उकळत आहे. या शहजादांकडून वापरल्या जाणाऱ्या उद्योगविरोधी भाषेशी आपण सहमत आहोत का," असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

मोदींनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा तसेच लोकसभेची जागा वडिलोपार्जित मालमत्ता समजल्याचाही आरोप केला. मोदी म्हणाले, "काँग्रेसच्या शहजादाकडून (राहुल गांधी) नक्षलवादी भाषेचा वापर होत असल्याने या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांत कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी उद्योगपती ५० वेळा विचार करतील,"

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघाविरुद्ध केलेल्या विधानावरून नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. या सामाजिक-धार्मिक संस्थांना मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी धमक्या दिल्या जात आहेत, असे मोदींनी पुरुलिया येथील सभेत सांगितले.

‘‘तृणमूल काँग्रेसने इतकी खालची पातळी गाठली आहे, की रामकृष्ण मिशन, इस्कॉन आणि भारत सेवाश्रम संघाविरुद्ध अपप्रचार करत सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ममता बॅनर्जी या संस्थांना धमकावीत आहेत. आपल्या मतपेढीचे तुष्टीकरण करण्यासाठी त्या अशा धमक्या देत आहेत," असा आरोप मोदींनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com