Vivek Kolhe News: विवेक कोल्हेंनी 'नाशिक शिक्षक'साठी ठोकला शड्डू...

Nashik Teachers Constituency 2024: विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या शिवसेना एकनाथ शिंदे गटात असलेले आमदार किशोर दराडे करत आहेत. त्यामुळे विवेकभैय्यांनी अपक्ष निवडणुकीचा निर्णय घेतल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
Vivek Kolhe News
Vivek Kolhe News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Teachers Vidhan Parishad : नाशिक शिक्षक मतदारसंघातून कोपरगावमधील युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी चाचपणी सुरू केली आहे. विवेक कोल्हे अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची ताकद मिळेल, असे सांगितले जाते.

युवा नेते विवेक कोल्हे हे भाजप नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांचे चिरंजीव आहे. शैक्षणिक संस्थाचालक असून सहकार क्षेत्रात दबदबा आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हे यांचा नेहमीच राजकीय संघर्ष राहिला आहे.

हा संघर्ष आता युवा पिढीपर्यंत येऊन पोहोचलाय. कोल्हे परिवाराकडून विवेक कोल्हे या राजकीय संघर्षाचे अलीकडच्या काळात प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. आता नाशिक शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हेंकडून चाचपणी सुरू झाल्याने ते चर्चेत आले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे स्थानिक पातळीवरील नेतृत्वावर नाराज आहेत. भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी त्यांचा राजकीय संघर्ष सुरू झाला. या राजकीय संघर्षाच्या लढाईत विवेक कोल्हेंनी अतिशय खुबीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची साथ मिळवली.

थोरातांच्या साथ मिळताच विवेकविखेंविरोधातील संघर्ष अधिक तीव्र केला. गणेश सहकारी कारखाना, ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये वर्चस्व, शिर्डीतील साईसंस्थानच्या कर्मचारी सोसायटीवर वर्चस्व मिळवले. नगर जिल्हा सहकारी बॅंकेत देखील संचालक म्हणून विवेक कोल्हे काम पाहत आहे.

Vivek Kolhe News
Sangli Lok Sabha 2024: सांगलीचा खासदार कोण? पैज लावणं दोघा मित्रांच्या अंगलट; पोलिसांनी उचललं मोठे पाऊल...

त्यांच्या निमित्ताने कोल्हे परिवार नगर जिल्ह्यातील राजकीय दबदबा वाढवत आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी परवडत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हे नाराज होत्या. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय नव्हत्या. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या घरी हजेरी लावली. यानंतर मात्र विवेक कोल्हे थेट नाशिक शिक्षक मतदारसंघाची तयारीत गुंतले. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विवेकभैय्यांच्या तयारीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे बळ असल्याचे बोलले जात आहे.

विवेक कोल्हे ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या शिवसेना एकनाथ शिंदे गटात असलेले आमदार किशोर दराडे करत आहेत. त्यामुळे विवेक कोल्हेंनी अपक्ष निवडणुकीचा निर्णय घेतल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील ६४ हजारांवर शिक्षक मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. आमदार दराडे आणि कोल्हे शैक्षणिक संस्थाचालक आहेत. या दोघांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार की, आणखी काय निर्णय होणार हा येणारा काळच सांगेल. या मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली होती. परंतु निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढे ढकलली आहे. त्यामुळे कोल्हेंना निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने कोल्हे यांनी शिक्षक मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन केल्याचे दिसते.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com