Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या 'रोड शो'द्वारे भाजपची ‘वातावरण निर्मिती‘!

Bjp News : २०२४ मध्ये मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार..
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

मंगेश वैशंपायन

Narendra Modi Rally News : भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानांचा ‘रोड शो‘ पार पडला. यावेळी सरदार पटेल चौक, संसद मार्ग ते नवी दिल्ली महापालिका केंद्राच्या सुमारे एका किलोमीटरच्या टप्प्यात सोमवारी(दि.१६) दुपारी उत्साहाला उधाण आले होते. हजारोंच्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा जमलेले नागरिक, गुलाब पाकळ्यांची वृष्टी, देशभक्तीपर गीतांच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते, मोदी-मोदीचा गजर आणि सुरक्षा यंत्रणेच्या नियमांतून वाट काढत थेट लोकांचे अभिवादन स्वीकारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा मोदीमय भाजपमय वातावरणात दिमाखदार रोड शो झाला.

जोश उत्साह आणि मोदींना पाहण्यासाठीची अधीरता ही या एक किलोमीटरच्या रोड शो ची वैशिष्ट्ये ठरली व नऊ वर्षांनंतरही मोदी या नावाबद्दल अगदी दिल्लीतच राहणारे असले तरी सर्वसामान्य लोकांमध्ये किती क्रेझ आहे, हे या रोड शओमधून दिसले. राजकीय नेत्यांच्या जाहीर सभांना गर्दी जमविली जाते हा नेहमीचा अनुभव. पण या रोज शो साठी जमलेल्यांमध्ये बहुतांश कार्यकर्ते भाजपचेच असल्याचे दिसले.

संसद मार्गापासून सुरू झालेला हा रोड शो एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर येथे समाप्त झाला.पटेल चौक ते कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणापर्यंत जल्लोषाचे वातावरण होते.

Narendra Modi
Deepak Kesarkar : केसरकरांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांना तोंडघशी पाडले; म्हणाले,भाजपसोबतचा ‘तो’ वाद गैरसमजातून!

दुपारी चारला सुरू झालेल्या या रोड शो साठी पटेल चौकाच्या परिसरात दुपारी एकपासूच गर्दी जमणे सुरू झाले होते. वाहतूक पोलिसांनी जवळपासच्या रस्त्यांवरील वाहतूक दुपारी बारानंतर इतरत्र वळविली होती. रस्त्यावर उभी असलेली वाहने इतरत्र नेण्याबाबत पोलिस तंबी देत होते. रस्त्याच्या एका टप्प्यावर पायी जाण्यासाठीही बंधने घालण्यात आली होती.

पंतप्रधानांची वाट पाहत असलेल्या लोकांच्या हातात पोस्टर, बॅनर होते. रस्त्यावर ठिकठिकाणी भाजपचे झेंडे आणि अटलबिहारी वाजपेयींपासून जे पी नड्डा व मोदींपर्यंत प्रमुख भाजप नेत्यांची मोठमोठी कटआऊट लावण्यात आली आहेत. लावण्यात आले होते. हा रोड शो कार्यकारिणीच्या ठिकाणी पोहोचल्यावर नड्डा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. ते स्वीकारून मोदींनी लगेचच कार्यकारिणी बैठक सुरू करण्याची सूचना केली

Narendra Modi
Bjp News: '' आता हरायचंच न्हाय!''; भाजपच्या जेपी नड्डांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले

काश्मीरपासून कन्याकुमारी व द्वारका ते कामाख्यापर्यंत नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेच देशातील निर्विवाद नेते आहेत आणि २०२४ मध्ये मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील हा अतिशय स्पष्ट संदेश आहे असे सूचक वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. यावर्षी तेलंगणासह ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होऊ शकतात. त्याच पार्श्वभूमीवर शहांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे असे सांगून शहा म्हणाले की गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल गुजरातसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. पोकळ आश्वासने देऊन लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने थप्पड मारली.मोदी यांची बदनामी करणआऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला मतदारांचा हा संदेश आहे असेही शहा यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com