PM Narendra Modi Speech : मणिपूरच्या मुद्यावरुन मोदींनी नेहरू अन् इंदिरा गांधींच्या कारभाराची लक्तरे काढली

PM Narendra Modi In Parliament : मणिपूरमधील हिंसाचाराला जबाबदार धरत कॉंग्रेसने रोज सत्ताधारी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

PM Narendra Modi In Parliament : मणिपूरमधील हिंसाचाराला जबाबदार धरत कॉंग्रेसने रोज सत्ताधारी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. जगभर फिरणारे मोदी मणिपूरला जात नसल्याकडे लक्ष वेधत, विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात सरकारची कोंडी केली. या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी खडे बोल सुनावून विरोधकांना उत्तर दिले. त्यानंतर मोदी गुरुवारी संसदेत बोलले; पहिल्या दीड तासांत मणिपूरचा मुद्दा न आल्याने विरोधक सभागृहाबाहेर निघून गेले. तेव्हाच, मोदींनी मणिपूरकडे आपल्या मोर्चा वळवला आणि कॉंग्रेसच्या (Congress) काळात ईशान्य भारतात झालेल्या अत्याचाराच्या घटना उघड केल्या. यानिमित्ताने कॉंग्रेसच्या धोरणाचे मुखवटे उतरविण्याचा प्रयत्न केला.

मणिपूर हिंसाचारावर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. मोदी म्हणाले, "मणिपूरमधील हिंसाचारात अनेकांनी आपले जवळचे आणि प्रियजन गमावले, महिलांच्या संबंधीत गुन्हे घडले. केंद्र आणि राज्य सरकार या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. देशाला विश्वास देऊ इच्छितो की मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल. मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की देश तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत.

PM Narendra Modi
PM Narendra Modi In Loksabha : पहिल्या दीड तासांच्या भाषणात मोदी मणिपूरवर काहीच न बोलल्याने विरोधकांचा सभात्याग

मणिपूरवर बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले विरोधक केवळ मणिपूरवर राजकारण करत आहेत. मणिपूरवर चर्चा करा असे किती वेळा सांगितले आहे. गृहमंत्र्यांनीही चर्चेसाठी सभापतींना पत्र लिहिले. पण विरोधकांना फक्त कथन करायचे आहे. ऐकण्यासाठी नाही. पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. ते म्हणाले की, मोदी मणिपूरवर बोलत नाहीत.

यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस मणिपूरवर राजकारण करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, "वंदे मातरम गाण्याने भारताच्या कानाकोपऱ्यात चैतन्य पसरवले, तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे वंदे मातरम गाण्याचेही तुकडे झाले. हे लोक भारत तेरे टुकडे होंगे गँगला प्रोत्साहन देण्यासाठी पोहोचतात. असे म्हणणाऱ्यांना ते मदत करत आहेत. आम्ही सिलीगुडीजवळचा कॉरिडॉर तोडला, तर त्यामुळे उत्तर पूर्व वेगळे होईल. ते त्याचे समर्थन करतात.

PM Narendra Modi
Gaurav Gogoi On PM Narendra Modi: अविश्वास प्रस्ताव आणण्यामागे विरोधकांचा उद्देश काय होता; खासदार गौरव गोगोईंनी सांगितले कारण

तामिळनाडूच्या पलीकडे, श्रीलंकेच्या आधी, एक बेट होते. बे बेट इतर देशाला कुणी दिले. तेव्हा तो माँ भारतीचा भाग नव्हता का? त्यावेळी सत्तेत कोण होते. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली हे घडत होते. काँग्रेसचा इतिहास भारतमातेचे विभाजन करण्याचा राहिला आहे, असा हल्लाबोल मोदींनी केला. ईशान्य भारतातील जनतेचा काँग्रेसने विश्वासघात केला. काँग्रेसने 1966 मध्ये मिझोरामवर हल्ला केला होता. ईशान्य भारताचा नेहरू विकास करत नाहीत, असा आरोप राममनोहर लोहिया यांनी केला होता, असेही मोदी म्हणाले.

मणिपूरच्या (Manipur) शाळांमध्ये एकेकाळी राष्ट्रविरोधी शिक्षण दिले जात होते. त्यावेळी काँग्रेसचे सरकार असल्याचा होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ईशान्य भारतातील समस्यांची जननी काँग्रेस असल्याचेही मोदी म्हणाले. ईशान्य भारत हा आमच्या काळजाचा तुकडा असून त्याचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचे मोदी म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com