Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे दिवाळीनिमित्त देशाला पत्र; देशवासियांना केले 'हे' भावनिक आवाहन!

Narendra Modi Diwali message : भगवान श्रीराम धर्मपालनाचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रेरणास्थान असल्याचे नमूद करताना त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या या कारवाईत भारताने धर्माचे पालन करत अन्यायाचा प्रतिकार केल्याचे मोदींनी म्हटले आहे.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पत्राद्वारे हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणानंतरची ही दुसरी दीपावली असल्याचे सांगितले. भगवान श्रीराम धर्मपालनाचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रेरणास्थान असल्याचे नमूद करताना त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या या कारवाईत भारताने धर्माचे पालन करत अन्यायाचा प्रतिकार केल्याचे मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या पत्रात सांगितले की, अलीकडच्या काळात अनेकांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा आणि संविधानावर विश्वास व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हे राष्ट्रासाठी एक मोठे यश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देश आता ‘नेक्स्ट जनरेशन’ सुधारणा राबवत असून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दर लागू करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की, ‘जीएसटी बचत उत्सव’मुळे नागरिकांना हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे. जगातील अनेक संकटांदरम्यान भारत स्थैर्य आणि संवेदनशीलतेचे प्रतीक बनला आहे. भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या प्रवासात नागरिकांचे कर्तव्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Narendra Modi
Japan PM update : जपानच्या संसदेने इतिहास घडवला; बहुमताशिवाय देशाला मिळाल्या पहिल्या महिला पंतप्रधान, काय घडलं?

पंतप्रधानांनी नागरिकांना ‘स्वदेशी’ उत्पादने वापरण्याचे आणि ‘हे स्वदेशी आहे’ असे अभिमानाने सांगण्याचे आवाहन केले. तसेच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला बळकटी देण्यासाठी सर्व भारतीय भाषांचा आदर करण्याचे आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

Narendra Modi
BJP vs Ravindra Dhangekar : भटके श्वान तुम्हालाही चावेल, एकनाथ शिंदेंनी त्याला आवरावं! धंगेकरांवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली...

आरोग्याला प्राधान्य देत, अन्नपदार्थांमध्ये तेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचा आणि योगाला दैनंदिन जीवनात स्थान देण्याचा सल्ला त्यांनी दिला. मोदी म्हणाले की, या छोट्या पण महत्त्वपूर्ण सवयी देशाला ‘विकसित भारत’ बनविण्याच्या दिशेने अधिक वेगाने सहकार्य करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com