BJP vs Ravindra Dhangekar : भटके श्वान तुम्हालाही चावेल, एकनाथ शिंदेंनी त्याला आवरावं! धंगेकरांवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली...

Srinath Bhimale’s Remark Creates Political Stir in pune : रवींद्र धंगेकर यांच्याकडून सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्याला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर असा संघर्ष पेटला आहे. सुरुवातीला रवींद्र धंगेकर यांनी कोथरूडच्या गुन्हेगारीवरून मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्यावर टीका केली. भाजपने सुरुवातीला धंगेकरांकडे दुर्लक्ष केलं, त्यानंतर संयमी भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली.

आता जैन बोर्डिंग होस्टेलच्या जागेच्या व्यवहारावरून रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केलाच पाहायला मिळत आहे. मोहोळ यांनी देखील माध्यमांवर आपला या व्यवहारामध्ये कुठलाही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. असं असलं तरी रवींद्र धंगेकर यांच्याकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.

रवींद्र धंगेकर यांच्याकडून सातत्याने मोहोळ यांना निशाणा केले जात असल्याने आता पुण्यातील स्थानिक भाजपचे नेतेमंडळी चांगलीच आक्रमक झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वेळी संयमी भूमिका घेणारे नेते आता समोर येऊन रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. काही नेत्यांकडून आता खालच्या पातळीवर जाऊन देखील टीका होऊ लागली आहे.

Ravindra Dhangekar
Japan PM update : जपानच्या संसदेने इतिहास घडवला; बहुमताशिवाय देशाला मिळाल्या पहिल्या महिला पंतप्रधान, काय घडलं?

भाजपचे नेते आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली आहे. भिमाले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की, धंगेकर नावाचा भटका कुत्रा तुम्ही सांभाळलेला आहे. ते कुत्रं शहरभर फिरत आहे. कुत्र्याने अनेकांना चावा घेतला आहे. सर्वप्रथम राज ठाकरे, उद्धव ठाकरे त्यानंतर नाना पटोले यांना त्या कुत्र्याने चावा घेतला असून आता ते तुमच्याकडे आलेलं आहे. हे आता तुम्हाला देखील चावा घेतल्याशिवाय राहणार नाही, असं भिमाले म्हणाले.

Ravindra Dhangekar
BJP Pune: वात पेटली! भाजप नेत्यानं पोलीस ठाण्यातच तालुकाध्यक्षांच्या विरोधात फोडले फटाके!

भाजपचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहेत. कुत्र्याला कोणतं इंजेक्शन द्यायचं आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. मात्र आमची एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, त्यांनी या भटक्या कुत्र्याला आवरावं, अशी जहरी टीका भिमाले यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com