Delhi News : भारताच्या यशस्वी चांद्रयान-3 मोहिमेचा खर्च सुमारे 600 कोटी रुपये होता. मात्र चांद्रयान मोहिमेसाठी खर्च केलेल्या निधीपेक्षा दुप्पट पैसे नरेंद्र मोदी सरकारने फक्त रद्दी विकून कमावले आहे. मोदी सरकारने रद्दी, जीर्ण झालेले कार्यालयीन उपकरणे आणि जुनी वाहने यासारख्या वस्तू विकून जवळपास 1200 कोटी रुपये कमावले आहे. ऑक्टोबर 2021 पासून भंगार आणि रद्दी विकून अंदाजे 1163 कोटी रुपये मोदी सरकारने कमावले आहेत. फक्त 2023 या एकाच वर्षीच सरकारला भंगार विकून 557 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. (Latest Marathi News)
ऑक्टोबर 2021 पासून केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये तब्बल 96 लाख फायली हटवण्यात आल्या आहेत, असे सरकारी अहवालात म्हटले आहे. आता या फाईल्स संगणकावर अपलोड करण्यात आल्या आहेत. यातून आणखी एक फायदा म्हणजे, सरकारी कार्यालयातील सुमारे ३५५ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली आहे. यामुळे कार्यालयांमधील कॉरिडॉरची साफसफाई, मोकळ्या जागेचा मनोरंजन केंद्रे आणि इतर उपयुक्त कारणांसाठी वापर करणे शक्य झाले आहे.
भंगार विकून सरकारने या वर्षी मिळवलेल्या 557 कोटी रुपयांपैकी एकट्या रेल्वे मंत्रालयाला सुमारे 225 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. इतर काही विभागांमध्ये संरक्षण मंत्रालयाला 168 कोटी रुपये, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय 56 कोटी रुपये आणि कोळसा मंत्रालयाला 34 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भंगार विकून - हटवून यावर्षी मोकळ्या करण्यात आलेल्या एकूण 164 लाख चौरस फूट जागेपैकी कोळसा मंत्रालयात सर्वाधिक 66 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे. अवजड उद्योग मंत्रालयातही 21 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे. यानंतर संरक्षण मंत्रालयात 19 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.
या वर्षी जवळपास 24 लाख फाईल्स हटवण्यात आले आहेत. यामध्ये परराष्ट्र मंत्रालयात सर्वाधिक (3.9 लाख फाईल्स) हटवण्यात आले. त्यानंतर लष्करी व्यवहार विभागात 3.15 लाख फाइल्स हटवण्यात आले. यामुळे सरकारी कार्यालयातील जागा रिकामे झाले आहे. याचा वापर इतर उपयुक्त कामांसाठी केला जातो.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.