Agnipath scheme : अग्निवीर योजनेत मोदी सरकार 'हे' बदल करण्याची शक्यता

narendra modi govt revisit agnipath scheme : अग्निवीरांची पहिली बॅच बाहेर पडण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. ही बॅच बाहेर पडण्यापूर्वीच सरकारला बदल करावे लागणार आहेत.
agnipath
agnipathsarkarnama

मागील वर्षी भारतीय लष्करात अग्निपथ ( Agnipath scheme ) ही योजना आणण्यात आली होती. या योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. 'इंडिया' आघाडीचं सरकार आल्यानंतर ही योजना बंद करण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी दिलं होतं.

यातच अग्निपथ योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करत काही बदल करण्याची शक्यता आहे. अग्निपथ योजना लागू होऊन दीड वर्षांचा कालावधी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दहा मंत्रालयांच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सचिव आपला अहवाल येत्या 18 जूनला केंद्र सरकारला सादर करतील.

अग्निपथ योजनेतील अग्निवीरांच्या प्रशिक्षणाचा कालावधी चार वर्षांचा आहे. तो सात वर्षांचा केला जाण्याची शक्यता आहे. त्यासह अधिकची भरती करणे, 25 टक्के अग्निवीरांना कायम ठेवण्याची मर्यादा वाढवून 70 टक्के केले जाऊ शकते. याशिवाय प्रशिक्षणादरम्यान किंवा कर्तव्यावर असताना अग्निवीर जवानाचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

agnipath
RSS On BJP : "आधी श्री रामाची भक्ती, नंतर अहंकार आला म्हणून..."; RSS च्या सदस्यानं भाजपला फटकारलं

नियमित लष्करी जवान आणि अग्निवीरांना दिलेल्या रजेतील फरकात सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे. अग्निवीरांची पहिली बॅच बाहेर पडण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. ही बॅच बाहेर पडण्यापूर्वीच सरकारला बदल करावे लागणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com