Narendra Modi : दिवाळीपूर्वी ७५ हजार नोकऱ्यांची पंतप्रधान करणार घोषणा ; 'या' संस्थामार्फत होणार भरती!

Narendra Modi : संरक्षण दल, उपनिरीक्षक, हवालदार, कारकून, स्टेनो, साहाय्यक, आयकर निरीक्षक पदांची भरती.
NArendra Modi
NArendra ModiSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी यंदाचा दिवाळसण आनंद देणारा असणार आहे. कारण यंदाची दिवाळी तरूणांना रोजगार देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात हजारो नोकऱ्यांची घोषणा करणार आहेत. ७५ हजार तरुणांना रोजगाराची दिवाळी 'भेट' असणार आहे. 75 हजार तरुणांना विविध मंत्रालये आणि सरकारी खात्यांमध्ये नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याची माहिती आहे.

NArendra Modi
भाजप खासदाराच्या 'त्या' वक्तव्यावर पक्षात प्रचंड नाराजी; जे.पी नड्डांनी मागितलं स्पष्टीकरण

नोकरी कुठे मिळेल ?

संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, सीआयएसएफ, सीबीआय, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील. देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सरकारच्या विविध ३८ मंत्रालये आणि वेगवेगळ्या खात्यांमध्ये गट अ आणि ब (राजपत्रित), गट ब (बिगर राजपत्रित) आणि गट क अशा तिन्ही गटांमधील पदांची भरती करण्यात येणार आहे.

संरक्षण दल, उपनिरीक्षक, हवालदार, कारकून, स्टेनो, साहाय्यक, आयकर निरीक्षक असे विविध प्रकारच्या पदांची भरती केली जाणार आहे.

NArendra Modi
Narendra Modi : यंदाची दिवाळी नोकऱ्यावाली, पंतप्रधान मोदी देणार ७५ हजार तरूणांना रोजगार!

कोणत्या संस्थांमार्फत होणार भरती प्रक्रीया?

सर्व मंत्रालये आणि सरकारच्या सर्व खात्यांमधील मनुष्यबळ आणि उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांचा संधीबाबतच्या आढावा घ्यावा, असे आदेश जूनमध्ये मोदींनी दिले होते.

याअंतर्गत पदभरती होणार आहे. सदर भरती ही थेट मंत्रालयांकडून किंवा यूपीएससी बोर्ड, एएसी, रेल्वे रिक्रूव्हमेंट बोर्ड इत्यादी संस्थांमार्फत पार पाडली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com