Narendra Modi : यंदाची दिवाळी नोकऱ्यावाली, पंतप्रधान मोदी देणार ७५ हजार तरूणांना रोजगार!

Narendra Modi : दिवाळीच्या दोन दिवस आधी २२ डिसेंबरला मोदी घोषणा करणार
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी यंदाची दिवाळसण आनंद देणारा असणार आहे. कारण यंदाची दिवाळी तरूणांना रोजगार देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात हजारो नोकऱ्यांची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. यातली एक विशेष गोष्ट म्हणजे पुढील वर्षी डिसेंबर अखेर १० लाख नोकऱ्या निर्माण होतील, असे मोदींनी यापूर्वीच जूनमध्येच सांगितले होते.

Narendra Modi
Koyana : कोयना जलविद्युत प्रकल्पग्रस्तांना पदभरतीत प्राधान्य... शंभूराज देसाई

सुत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान 22 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दोन दिवस आधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांशी संवाद साधतील. या दरम्यान ते ७५ हजार तरुणांना रोजगाराची दिवाळी 'भेट' ही देणार आहेत. 75 हजार तरुणांना विविध मंत्रालये आणि सरकारी खात्यांमध्ये नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याची माहिती आहे.

Narendra Modi
Dhananjay Munde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, स्वार्थासाठी सत्तेत आले : मुंडेंची शिंदे सरकारवर टीका!

नोकरी कुठे मिळेल?

यादरम्यान संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, सीआयएसएफ, सीबीआय, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील. देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या मंत्र्यांचा असेल सहभाग :

ओडिशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, चंदीगडचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे पीयूष गोयल, रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे, आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह. याशिवाय इतर अनेक मंत्री विविध शहरातून कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. त्याचबरोबर सर्व खासदार त्यांच्या मतदारसंघातून सहभागी होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com