Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; या भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण

Raj Thackeray News : या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं
Raj Thackeray and Eknath Shinde
Raj Thackeray and Eknath ShindeSarkarnama

Raj Thackeray Meets Eknath Shinde: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या या भेटीचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

राज ठाकरे यांनी आज नागपुरात (Nagpur) मनसे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं. तर राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीदरम्यान मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) हे देखील उपस्थित होते. तर या भेटीबाबत विधीमंडळातील कामकाजासह अन्य विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी भेटीचे फोटो ट्विट करत दिली आहे.

Raj Thackeray and Eknath Shinde
Raj Thackeray in Nagpur: ''...म्हणून मनसे वाढत असताना त्रास होणारच!''; राज ठाकरेंचा टीकेचा रोख नेमका कुणाकडे?

या भेटीबाबत मनसेनेही ट्विट करत माहिती दिली असून ट्विटमध्ये म्हटलं की, ''राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याचंच औचित्य साधून राज ठाकरे यांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री यांच्या दालनात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली, असं म्हटलं आहे.

Raj Thackeray and Eknath Shinde
Assembly Winter Session: शरमेची गोष्ट आहे.. म्हणत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखले...

दरम्यान, या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. तर येणाऱ्या काही दिवसांनी राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com