Gujarat riots 2002 Modi : गुजरात हत्याकांडावेळी मोदींनी राजीनामा दिला का? सीएम सिद्धरामय्या यांचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर

Narendra Modi Resign as Gujarat CM After Riots? Karnataka Congress CM Siddaramaiah Questions BJP, BJP stand and history : 2002च्या गुजरात दंगलीमध्ये सर्व धर्मांच्या सुमारे दोन हजार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
Gujarat riots 2002 Modi
Gujarat riots 2002 ModiSarkarnama
Published on
Updated on

Karnataka CM attacks BJP : कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात आमचे राजीनामे मागण्यापूर्वी, अशाच घटनांमध्ये राजीनामा दिलेल्या नेत्यांची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले.

तसंच 2002च्या गुजरात दंगलीमध्ये सर्व धर्मांच्या सुमारे दोन हजार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल करत भाजपवर तोफ डागली.

बंगळूर चेंगराचेंगरीच्या घटनेवरून भाजपच्या (BJP) वेगवेगळ्या संघटनांकडून रोज वेगवेगळा मुद्दा उकरून काढत, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा निषेध करत आहे, निदर्शने करत आहे. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, ‘आमचा राजीनामा मागण्यापूर्वी, मी राज्यातील भाजप नेत्यांना अशाच घटना घडल्यावर राजीनामा दिलेल्या भाजप नेत्यांची यादी जाहीर करण्याचे आवाहन करीत आहे'.

'चिन्नास्वामी (Karnataka) स्टेडियमजवळ जे घडले तो एक अपघात होता. एक जबाबदार सरकार म्हणून आम्ही या घटनेची जबाबदारी घेतो. आम्ही याबाबत प्रथमदर्शनी जाबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही निवृत्त न्यायाधीश जॉन मायकल कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय आयोगदेखील स्थापन केला आहे. आयोगाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे दोषींवर कोणताही संकोच न करता कारवाई केली जाईल', असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

Gujarat riots 2002 Modi
Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत राडा; राम शिंदेंच्या समर्थकांनी रोहित पवारांच्या प्रतिनिधींना भर सभेत धुतले!

'राज्यातील भाजप नेते राजकीय द्वेषातून निषेध करत आहेत, जनतेच्या काळजीपोटी नाही. मृतदेहांवर राजकारण करणे भाजपसाठी काही नवीन नाही. त्यांच्या टेबलावर हत्ती मेला असला तरी दुसऱ्याच्या पानावर मेलेली माशी दाखवणे ही भाजपची जुनी पद्धत आहे’, असा टोला देखील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लगावला.

Gujarat riots 2002 Modi
Top 10 News: - श्रीकांत शिंदेंचा भोंडेकरांना धक्का; कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत राडा - वाचा महत्त्वाच्या बातम्या

गुजरात दंगल आठवा

‘2002च्या गुजरात दंगलींमध्ये सर्व धर्मांच्या सुमारे दोन हजार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राजीनामा देण्यास सांगितले होते. मोदींनी राजीनामा दिला नाहीच, घटनेबाबत थोडासा पश्चात्तापही व्यक्त केला नाही. जे आमचा राजीनामा मागत आहेत, त्यांनी प्रथम याचे उत्तर द्यावे’, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले.

पहलगाम दहशतवाद्यांची ओळख पटली नाही

‘एप्रिलमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हत्याकांडात 26 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची जबाबदारी स्वीकारून आमच्या पक्षाने, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलेली नाही. याउलट या घटनेवर चर्चा करण्यासाठी किमान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची आमच्या पक्षाची मागणीही पंतप्रधानांनी मान्य केली नाही. देशभरात सिंदूर वाटणाऱ्या पंतप्रधानांना 26 निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या चार गुन्हेगारांची अद्याप ओळख पटलेली नाही. हे केंद्र सरकारचे अपयश नाही का? याची जबाबदारी कोणी घ्यायची, पंडित जवाहरलाल नेहरूंनी, राहुल गांधींनी की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?’, असा सवाल त्यांनी केला.

मणिपूर हिंसाचाराची जबाबदारी कुणाची

‘देशाच्या ईशान्य भागात असलेले मणिपूर गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. तरीही, त्या राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री बिरेन सिंह 20 महिने खुर्चीला चिकटून होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आजही तिथे हिंसाचार सुरूच आहे. याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेऊ नये का?'

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी

गुजरातमधील मोरबी पूल कोसळला, त्यात 140 जणांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारीमध्ये महाकुंभमेळ्यात 30यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला. त्या राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचे नाहीत का? राजीनामा देणे तर सोडाच, तेथील सरकारने त्या घटनांची योग्य चौकशीही केलेली नाही. अशा परिस्थितीत, राज्यातील भाजप नेत्यांना आमचा राजीनामा मागण्याची कोणती नैतिकता आहे? राज्यातील भाजप नेत्यांनी किमान निषेधांसारखे रस्त्यावरील नाटक सोडून द्यावे आणि त्यांच्या विवेकबुद्धीनुसार वागावे’, असा सल्ला सिद्धरामय्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com